पिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्र

पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे ला १४ दिवसाची न्यायालयीन कोठाडी ; येरवडा कारागृहात रवानगी

  • १९ हजारांची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून एसीबीची कारवाई
  • एक दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर न्यायालयाचा निर्णय

लोकमान्य टाइम्स : पिंपरी चिंचवड 

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे याला लाच प्रकरणात न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सतीश वाळके यांनी ही माहिती दिली.

महापालिकेतील ठेकेदाराच्या कामांच्या फाइलवर स्वाक्षरी करण्यासाठी तसेच बिलांच्या प्रक्रियेसाठी लाचेची मागणी केल्याचा आरोप ओंभासे याच्यावर आहे. संबंधित ठेकेदाराकडून सुरुवातीला ४५ हजार ७८५ रुपयांची मागणी झाल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर तडजोडीत १९ हजार रुपये स्वीकारल्याचा आरोप आहे. या प्रकरणी ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचून कारवाई केली आणि ओंभासे याला अटक केली. अटकेनंतर त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. पुढील तपासासाठी त्याना न्यायालयात हजर करण्यात आले असता सुरुवातीला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मंजूर केली. त्यामुळे त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

ओंबासे यांच्यावरील आरोप अद्याप न्यायालयात सिद्ध झालेले नाहीत?

महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर झालेल्या या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर आता या प्रकरणाच्या पुढील तपासाकडे लक्ष लागले आहे. मात्र, ओंभासे यांच्यावरील आरोप अद्याप न्यायालयात सिद्ध झालेले नाहीत. प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे.या तपासाकडे आता शहराचे लक्ष लागले आहे.