पिंपरी चिंचवडपुणे

मोशीचा कचरा डेपो करता काय ?  यापुढे कचऱ्याची एक ही गाडी मोशीत टाकून देणार नाही  

  • मोशीकरांच्या आरोग्यासाठी बोऱ्हाड्यांचा निखिल महानगरपालिका सर्वसाधारण सभेत कडाडला
  • अख्या शहराचा कचरा मोशीत टाकताय ; आमच्या आरोग्याचा कोणी विचार करणार आहे की नाही?  
  • तीन विधानसभानिहाय किंवा प्रत्येक प्रभागात कचऱ्याची विल्हेवाट लावा    

लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे
वर्षानुवर्षे पिंपरी-चिंचवड शहराचा पूर्ण कचऱ्याचा त्रास मोशी आणि परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्याचा ग्रामस्थांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. दूषित पाणी पुरवठा वाढला आहे. आजमितीस शहरातील  १५०० टन कचरा मोशी कारचा डेपोमध्ये येत आहे. पुढच्या  २० वर्षाचा विचार केला तर दिवसाला जवळपास ०६ हजार टन कचरा निर्माण होऊ शकतो. तो कचरा मोशीच्या माथी मारण्यात येणार असल्याने मोशीचा काय कचरा डेपो करता काय? असा प्रश्न क क्षेत्रीय अध्यक्ष, नगरसेवक निखिल बोऱ्हाडे यांनी केला आहे.

भविष्याचा विचार करता महानगरपालिका प्रशासनाने प्रत्येक प्रभागाचा कचरा हा ज्या त्या प्रभागातच प्रक्रिया करण्यासाठी विचार करावा; यापुढे मोशीमध्ये पूर्ण शहराचा कचरा टाकून देणार नाही ? मोशीकरांच्या आरोग्याशी खेळ करून देणार नाही? कचरा डेपोमुळे मोशी आणि परिसरातील ओढे, नाले, नद्या मध्ये घाण पाणी येत आहे.  येथे एस टी पी प्रकल्प नसता तर मोशीकरांना एकदमच श्रद्धांजली वाहावी लागली असती अशी आक्रमक भूमिका नगरसेवक निखिल बोऱ्हाडे यांनी महानगरपालिका सर्वसाधारण सभेत मांडली.

मोशी कचरा डेपो  दुर्घटनेला कारणीभूत असणाऱ्या अधिकारी, ठेकेदार यांच्यावर निश्चित कारवाई झाली पाहिजे. हि घटना दुदैवीच आहे. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांना महापालिका, ठेकेदार यांच्याकडून जास्तीतजास्त मदत मिळाली पाहिजे यासाठी आम्ही ही प्रयत्न करणार आहोत; मात्र यापुढे शहराचा कचरा मोशीमध्ये येऊ देणार नाही अशी भूमिका नगरसेवक निखिल बोऱ्हाडे यांनी व्यक्त केली. आम्ही ही महानगरपालिकेत सहभागी झाल्यापासून कर भरतोय ना का भरत नाही? असा प्रश्न बोऱ्हाडे यांनी उपस्थित केला.  वेस्ट टू एनर्जी मुळे कोणत्या विधानसभा मतदारसंघातून किती टन कचरा मोशी कचरा डेपोमध्ये येतो याची माहिती आम्हाला ही आहे. त्यात खडकीचा कचरा ही येथे येत आहे. महानगरपालिका प्रशासन  काय करत आहे असा प्रश्न बोऱ्हाडे यांनी उपस्थित केला. यापुढे फक्त मोशीतच कचऱ्यावर प्रकिया केली जाऊ नये त्यासाठी इतर जागी ही प्रशासन तो सुरु करावा.

पुनावळे येथे कचरा डेपोसाठी आरक्षण आहे. नव्या डी पी मध्ये ही ते त्यासाठी आरक्षित आहे. त्याठिकाणी जर आपण कचरा डेपो करणार नसाल तर यापुढे मोशी येथे ही कचरा येऊन देणार नाही. त्यासाठी कोणाला काय करायचे असेल ते करा. कोण माईका लाल येतोय ते आम्ही ही बघतो; आम्ही ही पूर्ण मोशी गाव रस्त्यावर उभे नाही केले तर आम्ही मोशीकर नाही असा इशारा बोऱ्हाडे यांनी यावेळी प्रशासनाला दिला. दरम्यान आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी हे कल्याण डोम्बवली येथे आयुक्त असताना तीन कचरा डेपो तयार केले होते याची आठवण करून देत आपल्यावर आमचा विश्वास आहे. आमच्या इथे राजकीय इच्छाशक्ती  दिसून येत नाही. याला सर्वच राजकीय पक्ष जबाबदार आहेत. त्यामध्ये आजी-माजी नगरसेवक ही तेवढेच जबाबदार आहेत त्यामध्ये मी सुद्धा आहे असे मत बोऱ्हाडे यांनी व्यक्त केले.

मोशी कचरा डेपो दुर्घटना ज्या अधिकाऱ्यामुळे झाली त्याचे निलंबन करा, त्यांनी काय …मारली; मात्र आमचा(मोशी ) कोणी विचार केला का ? त्यामुळे शहरात जेवढे प्रभाग आहेत तेथे कचऱ्याची यापुढे विल्हेवाट लावावी. ५०, १०० टन कचऱ्यावर त्याठिकाणी वेस्ट टू एनर्जी प्रकल्प सुरु करून त्याची विल्हेवाट लावा त्याचा त्रास आम्हाला का ? असा प्रश्न ही त्यांनी यावेळी उपस्थित केला. कचरा डेपो आमच्याकडे, बफर झोन ही मोशीलाच, आम्ही ही कर , पाणी पट्टी भरतोच ना, का आम्ही या शहरचे नागरिक नाही का ? असा प्रश्न ही उपस्थित केला. मोशीकरांच्या आरोग्यासाठी प्रथमच निवडूण आलेल्या नगरसेवक निखिल बोऱ्हाडे यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत नागरिकांच्यातून त्यांचे आभार मानले जात आहेत. त्यांनी घेतलेली भूमिका मोशीकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य असल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.