पिंपरी चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई : दुबईतून सायबर रॅकेट चालविणारा मुख्यसूत्रधार इंटरपोल च्या जाळ्यात
- मुंबई विमानतळावरून घेतले ताब्यात
लोकमान्य टाइम्स : पिंपरी चिंचवड
दुबईत बसून आंतरराष्ट्रीय स्तरावर सायबर फसवणुकीचे रॅकेट चालविणाऱ्या मुख्य सूत्रधाराला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी इंटरपोलच्या मदतीने अटक केली आहे. सुमंत उर्फ नानू रवींद्र दसरे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याला मुंबई विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले.
या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारीच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.
या प्रकरणात पोलिसांनी यापूर्वी तुषार अमराराम चौधरी आणि आदर्श संतोष वाघमारे या दोघांना अटक केली होती. हे दोघे विविध बँकांमध्ये खाती उघडून घेत असत. सायबर गुन्ह्यांमधून फसवणूक करून मिळालेली रक्कम रोख स्वरूपात तसेच चेकद्वारे काढून घेऊन त्यातील उर्वरित रक्कम दुबईत असलेल्या मुख्य आरोपी सुमंत दसरे याच्याकडे पाठवत असल्याचे तपासात समोर आले.

