पुणेमहाराष्ट्र

पुणे-मुंबई, पुणे-हैद्राबाद हायस्पीड रेल्वे कॉरीडॉरमुळे होणार जलद प्रवास

दळणवळणाला मिळणार चालना

रोजगार निर्मितीत नवनवीन संधी 

लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे 

लोकसभेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प रविवारी (दिनांक ०१) जाहीर केला. त्यामध्ये पुण्यासाठी आणि येथील प्रवास जलद होण्यासाठी पुणे – मुंबई आणि पुणे -हैद्राबाद हे दोन मार्ग हायस्पीड रेल्वे कॉरीडॉर जाहीर केले आहेत. या कॉरीडॉरमुळे प्रवास जलद होणार आहे. त्याच माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती ही होऊ शकते. तसेच दळणवळ सुधारण्यास चालना मिळणार आहे.

हाय-स्पीड रेल्वे सामान्य ट्रेनपेक्षा पूर्णपणे वेगळी असते. या गाड्यांसाठी पूर्णपणे स्वतंत्र मार्ग असतात. यावर इतर कोणतीही मालवाहतूक किंवा पॅसेंजर ट्रेन चालवली जात नाही. हे ट्रॅक शक्यतो जमिनीपासून उंचावर किंवा बोगद्यात असतात, जेणेकरून मध्ये कोणतेही अडथळे (प्राणी, माणसे किंवा वाहने) येणार नाहीत.

 त्यामुळे मुंबई -पुणे आणि पुणे -हैद्राबाद हायस्पीड रेल्वे कॉरीडॉर्स जाहीर केल्याने रेल्वेचा प्रवास अधिक जलद करण्यासाठी हायस्पीड रेल्वे कॉरीडॉर्स तयार करण्यात येणार आहे. यामुळे दोन शहरांमध्ये प्रवास अधिक जलद होईल आणि नागरिकांचा बराच वेळ वाचणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज त्यांचा नवव्या अर्थसंकल्प सादर केला आहे. नव्याने हायस्पीड रेल्वे कॉरीडॉर करण्याचा मानस आहेत ते पुढील प्रमाणे  : मुंबई-पुणे, पुणे-हैदराबाद, हैदराबाद-बंगळुरू, दिल्ली-वाराणसी, वाराणसी -सिलिगुडी.

जीडीपीत मोठी वाढ होईल

मुंबई-पुणे, पुणे-हैदराबाद हायस्पीड कॉरिडॉरमुळे जीडीपीत मोठी वाढ होईल. प्रत्येक ग्रोथ हबसाठी ५००० कोटी प्रत्येकी ५ वर्षांत प्राप्त होणार आहेत, त्याचा लाभ मुंबई महानगर (एमएमआर), पुणे महानगर, नागपूर महानगर ग्रोथहबसाठी होणार आहे.

देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री