बातम्यामहाराष्ट्र

गणेशोत्सवासाठी पुण्यात वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल

मध्यवर्ती भागात अवजड वाहनांना २४ तास बंदी

२५ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत नियम लागू

लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे

गणेशोत्सवाला अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. संपूर्ण राज्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या काळात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणाही सज्ज झाली आहे. पुणे शहर वाहतूक पोलिसांनी या उत्सव काळासाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल केले आहेत.

अवजड वाहनांवर बंदी

२५ ऑगस्ट २०२५ ते ७ सप्टेंबर २०२५ या कालावधीत पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील महत्त्वाच्या रस्त्यांवर अवजड वाहनांना २४ तास प्रवेशबंदी राहील. ही बंदी गणेश विसर्जन होईपर्यंत लागू राहील. मात्र, फायर ब्रिगेड, पोलीस, रुग्णवाहिका यांसारख्या अत्यावश्यक सेवांतील वाहनांना सूट असेल.


गणेशमूर्ती खरेदीसाठी विशेष वाहतूक बदल

२७ ऑगस्ट व ६ सप्टेंबर रोजी सकाळी ६ ते दुपारी १२ वाजेपर्यंत गणेशमूर्ती खरेदीसाठी मोठी गर्दी अपेक्षित आहे. यावेळी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी विशेष बदल करण्यात आले आहेत.

मुख्य मूर्ती विक्री केंद्रे :

  • डेंगळे पूल – शिवाजी पूल दरम्यान (श्रमिक भवन, कसबापेठ पोलीस चौकी, जिजामाता चौक, मंडई)
  • सावरकर पुतळा – समाधान भेळ सेंटर (सिंहगड रोड)
  • कुंभारवाडा, केशवनगर (मुंढवा)

महत्त्वाचे वाहतूक बदल

  • शिवाजी रोड (गाडगीळ पुतळा चौक – गोटीराम भैय्या चौक) वाहतुकीसाठी बंद राहील.

पर्यायी मार्ग :
१. गाडगीळ पुतळा चौक → संताजी घोरपडे पथ → कुंभारवेस चौक → शाहीर अमर शेख चौक.
२. शिवाजीनगरकडून स्वारगेटकडे जाणारी वाहने → जंगली महाराज रोड → खंडोजीबाबा चौक → टिळक चौक.
३. झाशी राणी चौक → खुडे चौक → डेंगळे पूल → कुंभारवेस.


पार्किंग व्यवस्था

गणेशभक्तांसाठी खालील ठिकाणी वाहनतळाची सोय करण्यात आली आहे :
१. न्यायमूर्ती रानडे पथ (कामगार पुतळा चौक – शिवाजी पुतळा).
२. संताजी घोरपडे पथ (महापालिका बिलभरणा केंद्र – गाडगीळ पुतळा चौक).
३. टिळक पूल – भिडे पूल दरम्यानचा नदीपात्र रस्ता.
४. मंडई येथील मिनर्व्ह व आर्यन पार्किंग तळ.
५. शाहू चौक – राष्ट्रभूषण चौक (फक्त रस्त्याच्या डाव्या बाजूस).


पीएमपीएमएल बस बदल

१. शिवाजीनगर स्थानकातून स्वारगेटकडे जाणाऱ्या बस जंगली महाराज रोड – टिळक चौक मार्गे धावतील.
२. कार्पोरेशन बसस्टॉपवरून स्वारगेटकडे जाणाऱ्या बस झाशी राणी चौक – जंगली महाराज रोड – अलका टॉकीज चौक मार्गे वळसा घेतील.


अवजड वाहनांना प्रवेशबंदी असलेले रस्ते

१. शास्त्री रोड (सेनादत्त चौकी चौक – अलका चौक)
२. टिळक रोड (जेधे चौक – अलका चौक)
३. कुमठेकर रोड (शनिपार – अलका चौक)
४. लक्ष्मी रोड (संत कबीर चौक – अलका चौक)
५. केळकर रोड (फुटका बुरुज – अलका चौक)
६. बाजीराव रोड (पुरम चौक – गाडगीळ पुतळा)
७. शिवाजी रोड (गाडगीळ पुतळा – जेधे चौक)
८. कर्वे रोड (नळस्टॉप चौक – खंडोजीबाबा चौक)
९. फर्ग्युसन कॉलेज रोड (खंडोजीबाबा चौक – वीर चाफेकर चौक)
१०. जंगली महाराज रोड (स.गो. बर्वे चौक – खंडोजीबाबा चौक)
११. सिंहगड रोड (राजाराम ब्रिज – सावरकर चौक)
१२. गणेश रोड / मुदलियार रोड (पॉवर हाऊस – जिजामाता चौक – फुटका बुरुज चौक)


वाहतूक पोलिसांचे आवाहन

“गणेशोत्सव काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी व नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि पोलिसांना सहकार्य करावे,” असे आवाहन पुणे शहर वाहतूक विभागाचे उपायुक्त हिंमत जाधव यांनी केले आहे.