‘अजितदादांची पिंक थिंक जोरावर’ जन सन्मान यात्रेच्या माध्यमातून विविध योजनांचा आधार घेत ‘काम करत आलोय…काम करत राहू’…ची घालतायत आजितदादा सर्वसामान्यांना साद
- अजितदादा यांच्या जन सन्मान यात्रेला उस्फुर्त प्रतिसाद
- दिंडोरी (नाशिक) मध्ये महिला भगिनींकडून जल्लोषात स्वागत
- महाराष्ट्रातील बहिणींना अजितदादाकडून योजना नेहमीच चालू राहील रक्षाबंधनच्या तोंडावर शब्द
- अजितदादांच्या पिंक थिंक ची जोरदार हवा
- अजितदादा यांना मिळतोय उत्तम प्रतिसाद ; दादा गटात संचारला उत्साह
- अजितदादा यांनी मारले एका दगडात अनेक पक्षी
लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे
लोकसभेतील सुमार कामगिरीनंतर महाराष्ट्रातील येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीने कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक फटका हा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाला बसला. लोकसभेचा पराभव पचवून नव्या दमाने आणि नव्या इराद्याने अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे.
त्याअनुषंगाने दादा यांनी ‘ पिंक थिंक ‘ वर स्वार होत अर्थमंत्री म्हणून राज्यातील जनतेला विविध योजनेच्या माध्यमातून होणार फायदा जनतेला कळवा या अनुषंगाने त्यांनी महराष्ट्रातील जन सन्मान यात्रा सुरू केली आहे. त्याची सुरुवात गुरुवारी (दिनांक ०८) दिंडोरी (नाशिक) येथून सुरू केली. या यात्रेस उस्फुर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसत असल्याने अजितदादा गटात नवीन उत्साह संचारला आहे. त्यातच रक्षाबंधनाच्या तोंडावरच काही झाले तरी माझी लाडकी बहिण ही योजना नेहमीच चालत राहील. जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे एकूण तीन हजार रुपये दिनांक १७ रोजी बहिणींच्या खात्यात जमा होतील असा विश्वास खुद्द अर्थमंत्री असणाऱ्या अजितदादा यांनी व्यक्त केल्यामुळे महराष्ट्रातील महिला भगिनिंच्या मध्ये आनंदाचे वातावरण आहे.
शेतीचे वीज बिल माफ : ४४ लाख शेतकरी बांधवांना होणार फायदा
ही योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना असे त्याचे नामकरण असेल तरी अजितदादा पवार यांनी सुरू केलेल्या जन सन्मान यात्रेदरम्यान पिंक बस वर माझी लाडकी बहिण असाच उल्लेख असल्याने या योजनेचे श्रेय हे अजितदादा पवार यानाच मिळत असल्याची चर्चा असून विधानसभेच्या तोंडावर ही यात्रा काढून विविध योजनांची माहिती, त्याअनुषंगाने किती निधी देण्यात येणार आहे त्याबाबतची पूर्ण माहिती अजितदादा स्वतः देत असल्याने खऱ्या अर्थाने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच त्यांनी एका दगडात अनेक पक्षी ( महाविकास आघाडी व महायुतीतील घटक पक्ष) मारल्याची चर्चा आहे.
त्याचबरोबर लाडक्या बहिणीबरोबर च लाडक्या भावासाठी येथून पुढचे शेतीतील वीज बिल भरू नये असे जाहीर केले. आणि कोणी वायरमन येथून पाठी मागचे बिलाचे काय म्हणाला तर त्याला माझे नाव सांगा असे जाहीर करून या निर्णयामुळे महाराष्ट्रातील जवळपास ४४ लाख शेतकरी बंधूंना त्याचा फायदा होईल असे जाहीर करीत आम्ही फक्त लाडक्या बहिणी यांचाच नव्हे तर लाडक्या भावांचा ही विचार करत असल्याचा टोला त्यांनी विविध समाज उपयोगी योजनांवर टीका करणाऱ्या विरोधकांना लगाविला.
गुलाबी थीम आणि अजितदादा
लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाला पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याअनुषंगाने अजितदादा यांनी निवडणुकीला कोणत्या प्रकारे सामोरे जायचे यासाठी काम करणाऱ्या टीमने अजितदादांच्या कलर कॉम्बिनेशन मध्ये पिंक (गुलाबी) कलर ला प्राधान्य दिले आहे. त्याअनुषंगाने अजितदादा यांनी पिंक जॅकेट ला प्राधान्य दिल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर कोणताही कार्यक्रम असेल तर बोर्ड पांढरा आणि त्यावर लिखित मजकूर हा गुलाबी रंगाचे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्यात आजपासून सुरू झालेल्या जन सन्मान यात्रेत वापरण्यात आलेल्या बस चा रंग ही गुलाबी करण्यात आला आहे. तसेच अजितदादांच्या ताफ्यात असणाऱ्या प्रत्येक चार चाकीचा रंग ही गुलाबी ठेवण्यात आल्याचे दिसत होते. जेव्हापासून अजितदादा यांनी पिंक कलर वापरण्यास सुरुवात केली आहे त्यापासून अजितदादा यांचा जनाधार वाढल्याची चर्चा त्यांच्या समर्थकांमध्ये असल्याचे पहावयास मिळत आहे.
‘ काम करत आलोय…काम करत राहू ‘ या गीताच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटात उत्साह फुंकण्याचा प्रयत्न
जनसन्मान होईल प्रगती ही अटल..
दादा आपला पक्का लाभ आणि बळ ..
लाडकी बहिण आता नेहमी हसरी राहील..
ही एकता आपली, ताकद अशीच वाढत जाईल…
घडयाळ विश्वासाचं थांबत नाही..
एक एक पाऊल चालत राहू…
काम करत आलोय….काम करत राहू…..