मोशी भागातील नागरिकांसाठी नोकरी महोत्सवाचे आयोजन
युवा नेते निखिल बोऱ्हाडे यांनी केले आयोजन
शनिवारी दिनांक ३१ रोजी जाधववाडी येथील रामायण मैदानावर पार पडणार नोकरी महोत्सव
लोकमान्य टाइम्स : पिंपरी चिंचवड
भोसरी विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली व निखिल बोऱ्हाडे सोशल फाउंडेशन यांच्यावतीने आयोजित भव्य नोकरी महोत्सव मोशी भागातील जाधववाडी येथील रामायण मैदान येथे शनिवारी ३१ ऑगस्ट रोजी पार पडत आहे,
मोशी भागातील सुशिक्षित, उच्चशिक्षित, कमी शिक्षित, बेरोजगारांसाठी भव्य नोकरी मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यासाठी हजारोंच्या संख्येने मोशी भागातील महिलावर्ग तरुण वर्ग व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, आपल्या भोसरी, चाकण, हिंजवडी, तळेगाव, पुणे, व महाराष्ट्रातील अनेक नामांकित कंपन्या या महोत्सवात सहभागी होणार आहेत, तरी आपण सर्वांनी या नोकरी महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील सामाजिक कार्यकर्ते निखिल बोऱ्हाडे यांनी केले आहे.