पिंपरी चिंचवडबातम्यामहाराष्ट्रराजकीय

अब की बार  १२५ पार ;  ०१ कोटी विरुद्ध ०१ लाख रुपये पैजेचा  विडा 

  • पिंपरी चिंचवड महापालिका  निवडणूक
  • भाजप विरुद्ध  राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची लागली पैज
  • भाजपला आत्मविश्वास की अहंकार  

लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे 

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने १२८ जागापैकी अब की बार १२५ असा नारा दिला आहे. हा भाजपचा आत्मविश्वास नसून तो अहंकार असल्याची टीका विरोधक करीत आहेत. त्याअनुषंगाने भाजप पदाधिकारी  आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारमध्ये एका लाख विरुद्ध एका कोटी रुपये पैज लागली असून तसा पैजे चा विडा ही उचलण्यात आला आहे. 

 भाजपचा हा अहंकार असून त्यांना जर १२५ जागा जिंकणार असा  आत्मविश्वास असता तर त्यांनी  जास्त रक्कमची पैज लावली असती.   निवडणुकीच्या निकलानंतर भाजपचा हा आत्मविश्वास नव्हे अहंकार गळून पडेल असा उपरोधात्मक टोला ही राष्ट्रवादी कंग्रेसच्या उमेदवारांने लावला आहे. 

त्याचे झाले असे आहे की, पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात महायुतीत असणाऱ्यांना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या घटक पक्षातच जोरदार टक्कर पहावयास मिळत आहे. त्याअनुषंगाने नाराजीमुळे म्हणा किंवा निवडूण येण्याच्या आत्मविश्वासाने आणि उमेदवारीच्या अंतिमिकरणाच्या दृष्टीने एकमेकांच्या पक्षात उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस जवळ आला असताना ही इनकमिंग सुरूच आहे.

त्या जोरावर तात्कालीन महापालिकेतील सत्ताधारी भाजपने  निवडणूक प्रमुख आमदार शंकर जगताप, हॅट्रिक आमदार महेश लांडगे, विधानपरिषद आमदार उमाताई खापरे, आमदार अमित गोरखे यांच्या नेतृत्वाखाली अब की बार १०० नव्हे १२५ पारचा नारा दिला आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा उपाध्यक्ष आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष योगेश बहल, निवडणूक प्रमुख विठ्ठल नाना काटे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने पूर्वाश्रमीची सत्ता काबीज करण्यासाठी जुने डाव टाकणे सुरु केले आहे. 

भाजपने २०१७ च्या निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत, मोठ्या प्रमाणावर केलेल्या  भ्रष्टाचाराच्या आरोपावर शहरवासीय भाजप ला नाकारतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसला आहे, तर भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशात आणि राज्यात मोठा विकास केला, महापालिकेमध्ये ही दिलेली सर्व आश्वासने भाजपने  पूर्ण केली आहेत. पुढील २५ ते ३० वर्षाचे नियोजन करून विकास कामे सुरु असल्यानेच राष्ट्रवादी काँग्रेस ला सोडचिठी देऊन अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याचा टोला भाजपने लागावीला आहे.

 त्यामुळे आता अब की बार १०० नव्हे १२५ पार होणार असल्याचा आत्मविश्वास भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी राजू दुर्गे यांनी व्यक्त केला आहे. तर काही झाले तरी भाजपचा नारा हा आत्मविश्वास नसून तो अहंकार आहे असे मत व्यक्त करीत भाजप विचारधारेला यावेळी शहरवासीय झिडकारतील असा विश्वास प्रभाग क्रमांक ०१ चे उमेदवार विकसे साने यांनी व्यक्त केला असून ०१ लाख रुपये विरुद्ध ०१ कोटी रुपये अशी पैज लागली आहे. त्यासाठी दोघांनी ही पैजेचा विडा उचलला आहे. त्यासाठी दोघांनी ही पैजेसाठी  लागलेल्या रक्कमचे स्वाक्षरी करून चेक जमा केले आहेत. त्यामुळे आता हा पैजेचा विडा कोण  भाजप की राष्ट्रवादी काँग्रेस जिंकणार याकडे शहरवासीय यांचे लक्ष लागले आहे.