बदलापूरातील अत्याचार घटनेच्या विरोधात शिवसेना उबाठा गटाकडून निषेध आंदोलन
गृहमंत्र्यांच्या निष्क्रियतेचा उबाठा गटाने केला निषेध
लोकमान्य टाइम्स : पिंपरी चिंचवड
बदलापूर येथे चिमुरडीवर झालेल्या अत्याचारच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने आकुर्डी येथे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांच्या निष्क्रियतेचा ही निषेध केला.
यावेळी शिवसेनेच्या जिल्हा संघटिका सुलभाताई उबाळे, भोसरी विधानसभा संघटक धंनजय आल्हाट, माजी नगरसेवक रवी बाबासाहेब लांडगे यांच्यासह पक्षाचे सर्व पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते. पिढीतीले न्याय मिळाला पाहिजे, बलात्कार करणाऱ्याला फाशी झालीच पाहिजे, या निष्क्रिय सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय अशा घोषणा देऊन उबाठा शिवसेना पक्षाकडून निषेध आंदोलन करण्यात आले.