आता कस भोसरी चा दादा म्हणेल तसे..! पिंपरी चिंचवडचा वस्ताद महेशदादाच वर शिक्कामोर्तब
-उपमुख्यमंत्री अजित दादांच्या टीकेला पिंपरी चिंचवड करानी झिडकारले
लोकमान्य टाइम्स संजय शिंदे
पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने गुरुवारी (दिनांक १५) मतदान पार पडले. उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचे समर्थक भोसरी विभानसभेचे आमदार पैलवान महेश लांडगे यांच्यातील आरोप-प्रत्यारोपामुळे महाराष्ट्रातील राजकीच वर्तुळाचे शुक्रवारी (दिनांक १६) होणाऱ्या निकाला कडे लक्ष लागले होते. त्यामध्ये पिंपरी चिंचवड महापालीकेत भाजपने एका हाती सत्ता प्रस्थापित केली. अजित पवार यांनी महेश लांडगे यांना लक्ष केले. ते पिंपरी चिंचवड करानी न स्वीकारता आता कस भोसरी चा दादा म्हणेल तसे अशी म्हणण्याची वेळ राष्ट्रवादी काँग्रेस वर आणल्याची चर्चा सुरु झाली आहे.
———————–
राज्यातील २९ महापालिका निवडणुकासाठी गुरुवारी मतदान पार पडले. त्यामध्ये मुंबई महापालिका निवडणुकीपाठोपाठ पुण्यासाह पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीमध्ये, राज्यात महायुती म्हणून एकत्रित असणाऱ्यांना भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे परस्पर विरोधात लढले ; हे जरी खरे असले तरी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री पवार विरुद्ध फडणवीस समर्थक आमदार लांडगे यांच्यात वैयक्तिक स्थरावर आरोप प्रत्यरोप झाल्याचे पहावयास मिळाले. त्यामुळे सत्ता राखण्याचे आव्हान भाजप समोर आहे. तर २५ वर्षाची सत्ता पुन्हा काबीज करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला यश येणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
—————————
२०१७ च्या महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसीची २५ वर्षाची एका हाती सत्ता खेचून घेण्यात भाजपचे चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वाखाली भोसरी विधानसभेचे आमदार पैलवान महेश लांडगे आणि ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांनी यश मिळविले होते. राष्ट्रवादी काँग्रेस मधील ६० पेक्षा जास्त नगरसेवकांना भाजपात प्रवेश देत त्यांना २०१७ महापालिका निवडणुकीत कमळ चिन्हावर महापालिकेच्या मैदानात उतरविले होते. त्याच्या जोरावर १२८ जगापैकी ७७ नगरसेवक कमळ चिन्हावर निवडूण आणत सत्ता काबीज केली होती.
भाजपची पुन्हा एका हाती सत्ता
वैयक्तिक टीकेची पातळी खालपर्यंत घसरल्याने ही निवडणूक पिंपरी-चिंचवड महापालिकेची आहे की पवार विरुद्ध लांडगे अशी आहे याबाबतच राज्यभर चर्चा रंगली. या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेचे आणि एकीकडे भाजपचे नेत्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या रनांगणात जोरदार बॅटिंग केली. प्रथमच पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीतील १२८ जगासाठी चुरस पहावयास मिळत होती. यामध्ये शुक्रवारी (दिनांक १६) झालेल्या् मटमोजणीत भाजपने एकहाती सत्ता मिळविली. आमदार महेश लांडगे यांच्यावर केलेली टीका शहरवासियांनी स्वीकारली नाही.
—————————-

भोसरी विधानसभा मतदार संघात सोशल मीडियावर फिरतंय हे पोस्टर

