पिंपरी चिंचवडपुणे

बांगलादेशी रोहींग्याबरोबरच कुदळवाडीतील अनधिकृत व्यवसायावर कारवाई करा ; आमदार महेश लांडगेनी हिवाळी अधिवेशनात उठविला आवाज

  • शासनाने नोंद घेऊन उचित कारवाई करावी : विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर
  • बांगलादेशी रोहींग्यावर निश्चित कारवाई केली जाईल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आ.लांडगेंच्या प्रश्नाला उत्तर
  • बांगलादेशी तिकडे हिंदूंच्यावर अत्याचार करतात ; आणि कुदळवाडी येथे बनावट कागदपत्राद्वारे राहणाऱ्यावर रोहिंग्यावर कारवाई झालीच पाहिजे : आ. लांडगे आक्रमक
  • अनधिकृत भंगार व्यवसाय आणि पर्यावरण दूषित करणाऱ्यांच्यावर ही कारवाई करा : आ. लांडगे

लोकमान्य टाइम्स : नागपूर

बांगलादेशी तिकडे राहणाऱ्या हिंदुंच्यावर अत्याचार करता. आणि ते लोक पिंपरी चिंचवड शहरातील कुदळवाडी परिसरात बनावट कागदपत्रांचा आदर घेऊन येथे वास्तव्य करीत आहेत. त्यांच्यावर आपण कारवाई करणार आहात का ? त्याबाबत पोलीस आयुक्त यांना आदेश देणार आहात का ? तसेच गेल्या आठवड्यात कुदळवाडी परिसरातील गोदामाला भीषण आग लागली. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या सोसायटी धारक यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

तसेच याच परिसरात अनधिकृतपणे रासायनिक पाणी नदीत सोडल्यामुळे नदी प्रदूषित होऊन पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या घटकावर कारवाई करण्याचे आदेश आपण महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना देणार आहेत का ? असा आक्रमक प्रश्न हिवाळी अधिवेशनात भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांनी उपस्थित केला. त्यावर विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांनी शासनाने याची नोंद घेऊन उचित कारवाई करण्याचे आदेश दिले.

तदनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार लांडगे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जे सदस्य विविध विषय मांडत आहेत ते विषय गांभीर्याने ऐकतो आहे. त्या विषयाची निश्चित नोंद घेण्यात येईल. तसेच संबंधित प्रशासनाला आ. महेश लांडगे यांनी विचारलेल्या प्रश्नांच्या अनुषंगाने त्वरित आदेश देऊन कारवाई करण्याचे आदेश देण्यात येतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

आमदार महेश लांडगे यांच्या भोसरी विधानसभा मतदार संघात कुदळवाडी हा भाग येतो. त्याठिकाणी गेल्या आठवड्यात भीषण आग लागली. त्या आगीच्या भक्षस्थानी जवळपास पन्नास गोडाऊन जाळून खाख झाली. त्यामाध्यमातून लांबपर्यंत धुराचा लोट निर्माण होवून त्याचा त्रास परिसरात असणाऱ्या हजारो सोसायटीमध्ये राहणाऱ्या लाखो सोसायटी धारकांना सहन करावा लागला. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर अनधिकृत स्क्रॅप व्यवसाय केला जातो. त्याचबरोबर या ठीकाणाहून रसायन मिश्रीत पाणी नाल्याद्वारे सरळ इंद्रायणी नदीत मिसळत असल्याने नदी प्रदूषित होत आहे. त्याचा त्रास नदीकाठी राहणाऱ्या लाखो सोसायटीधारकांसह नदीवर अवलंबून असणाऱ्या शेतकरी यांना सहन करावा लागत असल्याचे मत आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केले.

याठिकाणी बांगलादेशी लोक अनधिकृतपणे बनावट कागदपत्रांच्या आधारे रहात आहेत. ते लोक प.बंगालमध्ये येवून त्याठिकाणी बनावट कागदपत्रांच्या आधाराने आधार कार्ड, पासपोर्ट व इतर कागदपत्रे तयार करून पिंपरी चिंचवड शहरातील कुदळवाडी मध्ये वास्तव्यास येत आहेत. त्यावर पोलीस प्रशासनाने जवळपास ७० बांगलादेशी रोंहींग्यावर कारवाई करत त्यांना त्यांच्या मूळ देशात पाठविले आहे. तसेच यासिम भटकळ हा आतंकवादी कुदळवाडी येथे वास्तव्यास होता यांचे पुरावे आपल्या विभागाकडे आहेत अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी नागपूर येथे सुरू असणाऱ्या अधिवेशन दिली.

त्याचबरोबर मुख्यमंत्री महोदय पिंपरी चिंचवड शहरात येणाऱ्या व माझ्या मतदारसंघात येणाऱ्या कुदळवाडी येथे अनधिकृत रित्या अनेक व्यवसाय सुरू आहेत. त्याच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे. याबाबत प्रशाशनला विचारले असता याठिकाणी जवळपास तीन हजार पेक्षा जास्त व्यवसाय हे अनधिकृतरीत्या चालतात. त्याठिकाणी कारवाई करण्यास गेल्यावर मोठा उद्रेक होवू शकतो अशी प्रशासनाची भूमिका आहे. त्यामुळे आपण संबंधित प्रशासनाला अनधिकृत स्क्रॅप व्यवसाय व इतर अनधिकृत व्यवसाय, की ज्याच्यामुळे नदी प्रदूषित होणे, पर्यावरणाचा ऱ्हास होणे याला हातभार लावणाऱ्या व्यवसायावर कारवाई करण्यासाठी आपण संबंधित विभागानं आदेश देणार आहात का ? असा प्रश्न उपस्थित केला. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागाला त्वरित आदेश देण्यात येतील असा विश्वास व्यक्त केला.