शालेय परिसरात बुलेट स्टंट करणाऱ्या रोड रोमिओंना मनसे दणका ; शहरातील इतर भागातील रोड रोमिओंचे काय..?
- निगडी मनसे पदाधिकारी यांनी बुलेट चे स्टंट करण्याऱ्या दिला चोप
- पोलिस ठाण्यात ही दिली तक्रार
- मनसेच्या या मोहिमेचा पालक वर्गातून स्वागत
लोकमान्य टाइम्स : पिंपरी चिंचवड
माता अमृतानंद शाळा , शिवभूमी शाळा, मॉर्डन शाळा,SPM शाळा या परिसरात बेफाम बुलेट स्टंट करणाऱ्या रोड रोमिओंचा त्रास आता खपवून घेतला जाणार नाही. शालेय परिसरात घोंघावत फिरणाऱ्या आणि कानठळ्या बसवणारा आवाज काढणाऱ्या या माथेफिरूंच्या तक्रारी आमच्याकडे येत होत्या. अश्याच प्रकारची तक्रार आज येताच या दहशतीवर मनसे स्टाईलने थेट कारवाई करत ठोस इशारा दिला आहे. निगडित मनसे व इतर पक्षाच्या पदाधिकारी यांनी उचललेल्या पाऊलाचे कौतुक होत असेल तरी पिंपरी चिंचवड शहरात इतर भागात ही हा त्रास सहन करावा लागत आहे त्यासाठी संबंधित पक्ष पदाधिकारी आणि पोलीस प्रशासन काय भूमिका घेणार असा सवाल उपस्थित होत आहे.
प्रभागाच्या कामानिमित्त आम्ही तिघे , मी (सचिन चिखले), बापू घोलप आणि उत्तम केंदळे एकत्र होतो. तक्रार येताच कोणताही वेळ न दवडता आम्ही या स्टंटबाजांचा पाठलाग केला आणि मनसे स्टाईलने त्यांना सणसणीत प्रत्युत्तर दिले.
ही मोहीम येत्या काही दिवसांत अधिक तीव्र केली जाणार आहे. जर अशाच प्रकारच्या धिंगाण्याची पुनरावृत्ती झाली, तर त्याचा थेट परिणाम होईल! त्यामुळे नागरिकांनीही सजग राहावे, आणि अशा उपद्रवी टोळक्यांची माहिती आम्हाला द्यावी.
अशा असभ्य वर्तनावर आता आळा बसणारच.
- शाळा सुटताना मुलींना मुद्दामपणे त्रास देणे
- वृद्ध नागरिकांना विनाकारण हैराण करणे
- रस्त्यावर स्टंट करत उगाचच शो ऑफ करणे
- सिगारेट ओढून परिसर अस्वच्छ करणे
- अश्लील वर्तन करणे.
दहशत मजविण्याचा प्रयत्न केला तर गाठ आमच्याशी
या संदर्भात आज निगडी पोलीस स्टेशनला याची माहिती दिली असून, लवकरच सदर भागात पोलीस बंदोबस्त अधिक कडक केला जाणार आहे. आता कुणीही या रस्त्यांवर दहशत माजवायची प्रयत्न केला तर त्यांची गाठ आमच्याशी असल्याचा इशारा देत, नागरिकांनो, हा लढा आपल्या सुरक्षिततेसाठी आहे, सतर्क राहा, आणि कुठेही गैरप्रकार दिसल्यास आम्हाला तत्काळ कळवा असे आवाहन करीत आहे.
सचिन चिखले, मा. नगरसेवक , मनसे