पिंपरी चिंचवडराजकीय

चांदगुडे, कलाटे, बोऱ्हाडे, काटे, लांडगे, शिंदे यांच्या नावाची चर्चा 

महापौर पदासाठी जोरदार लॉबीग सुरु 

– चिंचवड,भोसरी, पिंपरी विधानसभापैकी कोण मारणार बाजी 

लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरपदाची सोडत निघाली आहे. यात पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौरपद हे सर्वसाधारण खुला गट वर्गासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे भाजपच्या ८४ विजयी नगरसेवकांपैकी महिला किंवा पुरुष नगरसेवकाला महापौरपद मिळण्याची संधी निर्माण झाली आहे. त्यासाठी महिला गटातून बिनविरोध नगरसेविका सुप्रियाताई चांदगुडे, नगरसेविका स्नेहा कलाटे, सारिकाताई बोऱ्हाडे तर पुरुष गटातून भाजप  शहराध्यक्ष नगरसेवक शत्रुघ्न काटे, शितल उर्फ विजय गोरख शिंदे,  बिनविरोध नगरसेवक रवी बाबासाहेब लांडगे, जालिंदर शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे. 
————————–
राज्यात २९ महापालिकांच्या निवडणुकीच्या  निकालानंतर सर्वाधिक जागा जिकंलेल्या. पक्षाकडून सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका महापौर पदासाठी आरक्षण गुरुवारी (दिनांक २२) सोडत जाहीर करण्यात आली आहे. त्यात महापौरपद हे सर्वसाधारण गटासाठी जाहीर झाले आहे. पिंपरी -चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपने सर्वाधिक ८४ जागा जिंकल्या आहेत. त्यापैकी  खुल्या गटातील महिला किंवा पुरुष गटातून निवडूण आलेल्या नगरसेविका आणि नगरसेवक यांच्यापैकी एकाला अडीच वर्षे किंवा सव्वा वर्षे (असे दोन) जणांना संधी मिळणार आहे. 
—————————-
नुकत्याच पार पडलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी थेट लढत झाली. दोन्ही बाजूने पिंपरी-चिंचडच्या महापालिकेची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची करण्यात आली होती. राज्यात महायुतीत एकत्र असतानाही पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार आणि भाजपमध्ये कडवा संघर्ष पाहायला मिळाला. पण भाजपने आपली पूर्ण ताकद लावत राष्ट्रवादीला धोबीपछाड देत सत्ता मिळवली. 
———————————-
पिंपरी-चिंचवड महापालिकेत तब्बल ८४ जागा जिंकत भाजपनं एकहाती सत्ता काबीज केली आहे. त्यामुळे या महापालिकेत भाजपचाच महापौर होणार हे निश्चित आहे. पण महापौरपदासाठी काही नेत्यांनी लॉबिंग सुरु केली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर पदाची सोडत निघाली आहे. यात पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर पद हे सर्वसाधारण खुल्या गट वर्गासाठी आरक्षित झाले आहे. 

———————————

त्यामुळे भाजपच्या ८४ विजयी नगरसेवकांपैकी महिला किंवा पुरुष नगरसेवकाला महापौरपद मिळण्याची संधी निर्माण झाली आहे. यात महापालिकेच्या इतिहासात प्रथमच महिला नगरसेविका  बिनविरोध निवडून आलेल्या प्रभाग क्रमांक १० च्या नगरसेविका सुप्रिया चांदगुडे, प्रभाग क्रमांक २६ च्या  स्नेहा कलाटे तर प्रभाग क्रमांक ०२ मधील दुसऱ्यांदा  निवडूण आलेल्या आणि उच्य शिक्षित सारिकताई बोऱ्हाडे यांच्या नावाची चर्चा आहे. 

——————————–

 तर पुरुष गटातून पिंपरी-चिंचवड शहर व जिल्हा भाजपचे शहराध्यक्ष व प्रभाग क्रमांक २८ चे नगरसेवक शत्रुघ्न काटे, प्रभाग क्रमांक १९  नगरसेवक पदाची हॅट्रिक करणारे आणि भाजपचे जुने निष्ठावंत  शितल उर्फ विजय गोरख शिंदे, प्रभाग क्रमांक ०६ मध्ये २०१७ आणि २०२६  या दोन्ही निवडणुकीत बिनविरोध म्हणून निवडूण आलेले आणि भाजपला सत्ता मिळविण्यासाठी लकी असणारे रवी बाबासाहेब लांडगे तसेच प्रभाग क्रमांक ०५ मधील नगरसेवक पदाचा अनुभव असणारे नगरसेवक जालिंदर शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा भाजपमध्ये आहे.     

——————————