पिंपरी चिंचवडबातम्याराजकीय

माजी नगरसेवक पंकज भालेकरांचे नाव तळवड्यातून  केले चिखली प्रभागात स्थलांतरित 

  • प्रशासनाचा सावळा गोंधळ की, जाणूनबुजून केलेले कृत्य
  • मतदान स्थलांतरीत केलेल्या मतदारांचा सवाल 

लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे 

तळवडे येथील राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार गटाचे माजी नगरसेवक पंकज भालेकर यांचे नाव मतदार यादीतून गायब केले आहे. तर त्यांच्यासह त्यांच्या राहत्या घराच्या परिसरातील १२६१ मतदाराची यादी देखील शेजारी चिखली प्रभागात वर्ग करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकारामुळे पंकज भालेकर समर्थक आक्रमक होत त्यांनी याबाबत संशय व्यक्त केला आहे. 

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुक विभागाकडून मतदार यादी प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. या मतदार यादीमधून प्रशासनाचा सावळा भोंगळ उघड झाला आहे. तळवडे प्रभाग क्रमांक १२ मधील यादी भाग क्रमांक ७ मधील एक हजार ६१ मतदारांची नावे शेजारील चिखली प्रभागात वर्ग केल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

निवडणूक विभाग कोणासाठी काम करत आहे 

 निवडणुकीच्या तोंडावर एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदारांचे स्थलांतर करून निवडणूक विभाग कोणाचा फायदा करून देण्याचा प्रयत्न करत आहे, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

हा प्रकार जाणूनबुजूनच

गेल्या आठ वर्षांत रेडझोन हद्दीतील प्रश्न  आक्रमक मांडून, वेळ पडली तर प्रशासनच्या विरोधात  भूमिका घेत विकास कामे भालेकर यांनी करुन घेतली आहे. त्यांचेच नाव यादीतून गायब केल्याने समर्थकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.याबाबत मतदार यादीतील गंभीर चुका, त्रुटी आणि दुबार मतदार हे यादीमधून उघड होत आहेत. त्यात माझे मतदार यादी नाव वगळले असून आमच्या प्रभागातील यादी देखील इतर प्रभागात टाकली आहे. त्यामुळे हे चुकून की जाणूनबुजून केले, हे माहिती नाही. याबाबत आम्ही निवडणूक विभागाकडे हरकत घेणार आहे, असे माजी नगरसेवक पंकज भालेकर यांनी सांगितले.