बातम्या

हिंदुत्ववादी आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त मोशीत ‘जाणता राजा’ महानाट्य 

  • स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण, छत्रपती श्री संभाजी महाराज पुतळ्यासमोर ६ व ७ डिसेंबरला निखिल बोऱ्हाडे यांच्यावतीने आयोजन 

लोकमान्य टाइम्स : प्रतिनिधी 

कट्टर हिंदुत्ववादी आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित ‘जाणता राजा’ या महानाट्याचे आयोजन डिसेंबर ६ आणि ७ तारखेला करण्यात आले आहे. 

हे महानाट्य स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण छत्रपती श्री संभाजी महाराज पुतळा, आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन केंद्र, मोशी येथे सायंकाळी ६:३० वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती  प्रभाग क्रमांक २ चे युवा नेते आणि आमदार महेश लांडगे यांचे कट्टर निष्ठावंत शिलेदार निखिल बोऱ्हाडे यांनी माध्यमाशी बोलताना दिली. 

यावेळी बोलताना बोऱ्हाडे पुढे म्हणाले,  आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे ही आयोजन करण्यात आले आहे. आमदार महेशदादा यांनी घालून दिलेल्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण यानुसार प्रभाग क्रमांक ०२ मधील तळागळातील शेवटच्या घटकापर्यंत सोयी- सुविधा पुरविण्यात येत आहेत. 

त्यामध्ये प्रामुख्याने नागरी सुविधा, रस्ते, वीज, पाणी पुरवठा, आरोग्य समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच  मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र येथे पूर आल्यानंतर निर्माण झालेली परस्थिती च्या अनुषंगाने अन्नधान्य वाटप, गोधनाचे वाटप केले. हे सर्व आमदार महेशदादा यांच्या आशीर्वाद आणि मार्गदर्शन यामुळे साध्य झाल्याचे मत निखिल बोऱ्हाडे यांनी व्यक्त केले.