स्वातंत्र्यदिनानिमित्त माजी सैनिकांचा सत्कार; उपस्थितांनी लुटला देशभक्तीपर गीतांचा आनंद
लोकमान्य टाइम्स : पिंपरी चिंचवड
१५ ऑगस्ट स्वांतत्र्यदिनानिमित्त आपला म्युझिकल ग्रुप यांच्या वतीने ‘’ऐ वतन तेरे लिए या देशभक्तीपर तसेच चित्रपट गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन ग दि माडगूळकर सभागृह, आकुर्डी येथे करण्यात आले होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित कलाकारांनी आणि आयोजकांनी देशभक्तीपर तसेच विविध चित्रपटातील गीतांचे प्रभावीपणे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमास माजी उपमहापौर तुषार हिंगे, माजी नगरसदस्य संदीप वाघेरे, उद्योजक पांडुरंग वाळुंज तसेच दत्तू राठोडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी कर्नल हरिहरन अय्यर, मेजर उदय जरांडे, कॅप्टन प्रमोद निकम, सर्जंट सुनील चौधरी, हेड कॉन्स्टेबल सुदाम सुर्वे, ओ/एस मीना उपासनी, कनिष्ठ अभियंता मंगेश पवार, हवालदार काका पाटील, मानसिंग गायकवाड, रेवणनाथ जाधव, सुभाष जाधव, नायक पंढरीनाथ चौरे, बाळासाहेब रणसिंग या माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. तसेच पुण्यातील प्रसिद्ध साऊंड इंजिनियर शैलेश घावटे यांच्या आई-वडिलांना आदर्श माता पिता म्हणून सन्मान करण्यात आला. तर कलाकार शुभांगी पवार व अरुण सरमाने यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर डॉ. अजय राऊत यांनी शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती हे गाणे गाऊन प्रेक्षकांची वाहवा मिळविली. इतर कलाकारांनी हे राष्ट्र देवतांचे, जिंदगी मौत ना बन जाए, साथी हात बढाना, चिट्ठी आई है, ए मेरे वतन के लोगो, ये मेरा इंडिया, मेरे देश की धरती, हर करम अपना करेंगे, भारत का रहने वाला हू ही देशभक्तीपर गीते कलाकारांनी सादर केली. तसेच ऐसी दिवानगी, बाजीगर ओ बाजीगर, यार बिना चैन कहा रे, कर चले हम फिदा जाने तन साथियो, अशा विविध चित्रपटातील गाण्यांचा आनंदही उपस्थित रसिकांनी घेतला.
या कार्यक्रमाचे आयोजक अनिल घाडगे आनंद गायकवाड, सह आयोजक सौ नेहा दंडवते, मल्लिकार्जुन बनसोडे, पूजा जैन यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. तसेच डॉ. अजय राऊत, शकुंतला श्रीनिवासन. एस आर लांजेकर, उज्वला वानखेडे, राधिका कोल्हापूरकर, प्रशांत कोल्हापूरकर या कलाकारांनी देशभक्तीपर व चित्रपट गीतांचे प्रभावी सादरीकरण करून रसिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.