बातम्यामहाराष्ट्रराजकीय

दुबार मतदारावर डब्बल स्टार ; निवडणूक आयोगाने शोधला पर्याय

  • नगरपंचायत आणि नगरपरिषद च्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
  • राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची माहिती

लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे

सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिलेत. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाकडून २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. दरम्यान, दुबार मतदारांवर निवडणुक आगोयाने भाष्य करत मोठा निर्णय घेतला आहे.

दुबार मतदारांपर्यंत राज्य निवडणूक आयोगाचे कर्मचारी पोहचतील. मतदारांना मतदान केंद्रे आणि नाव शोधण्यासाठी खास APP बनवण्यात आले आहे. दुबार मतदारांसमोर डबल स्टार करण्यात आलेले आहेत. असा मतदार केंद्रावर आल्यानंतर त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र घेतले जाईल. त्याला एकाच केंद्रावर मतदान करता येईल असं दिनेश वाघमारे यांनी म्हटलं.

अर्ज दाखल करण्यास सुरुवात – १० नोव्हेंबर २०२५, अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत – १७ नोव्हेंबर २०२५, अर्जांची छाननी – १८ नोव्हेंबर २०२५, अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत – २१ नोव्हेंबर २०२५, आक्षेप असलेल्या ठिकाणी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत – २५ नोव्हेंबर २०२५निवडणूक चिन्ह व उमेदवारांची अंतिम यादी – २६ नोव्हेंबर २०२५मतदान – २ डिसेंबर २०२५मतमोजणी – ३ डिसेंबर २०२५निकाल जाहीर करण्याचा दिवस – १० डिसेंबर २०२५

दुबार मतदारांवरुन राजकीय वर्तुळात खडाजंगी

महाविकास आघाडीसह मनसे कडून शनिवारी मुंबईत ‘सत्याचा मोर्चा’ म्हणत निवडणूक आयोगाच्या विरुद्ध एल्गार पुकारण्यात आला होता. विरोधकांना केवळ ‘हिंदू दुबार मतदार’ दिसत असून, त्यांच्या मतदारसंघात मोठ्या संख्येने असलेल्या मुस्लिम आणि ख्रिश्चन दुबार मतदारांवर ते मौन बाळगून आहेत, असा पलटवार शेलार यांनी केला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना शेलार यांनी मविआकडून ‘ठरवून फेक नरेटिव्ह’ तयार केला जात असल्याचा आरोप केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघात ५ हजार ५३२ मुस्लिम दुबार मतदार असून, ते स्वतः अवघ्या १ ते दीड हजार मतांनी निवडून आले आहेत. तसेच, मुंब्रामध्ये ३० हजारांहून अधिक आणि नाना पटोले यांच्या साकोली मतदारसंघात ४०० हून अधिक मुस्लिम दुबार मतदार असल्याचा दावा शेलार यांनी केला.

राज ठाकरे यांनी सांगितलेल्या मतदारसंघात त्यांना केवळ भोईर, पाटील अशी आडनावे दिसली, पण ‘आसमा’ दिसली नाही. त्यांच्या भूमिकेतून त्यांना केवळ मराठी माणूस आणि हिंदू दुबार मतदारच दिसले का?” ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत मविआने अनेक प्रामाणिक मतदारांची नावे वगळून ‘व्होट-जिहाद’ केला. मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाचे एकूण १६ लाख ८४ हजार २५६ दुबार मतदार असू शकतात, असेही यावेळी शेलार यांनी सांगितले.