अजितदादा राष्ट्रवादीसमोर नवनवीन प्रस्ताव ; पक्षातील इच्छुक गॅसवर
- पवार , काँग्रेसच्या प्रस्तावामुळे स्वईच्छुक उमेदवारीवर टागंती तलवार
लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे
पिंपरी -चिंचवड महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने कंबर कसली आहे. पक्ष प्रवेशाच्या कोलंट उड्ड्या सुरु झाल्या आहेत. स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शरद पवार गट आणि काँग्रेस पक्ष एकत्रित येण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. त्या माध्यमातून अजित पवार यांच्यासमोर शरद पवार पक्ष आणि काँग्रेसने जागा वाटपाबाबत प्रस्ताव ठेवले आहेत. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादीमधील काही प्रभागात स्वईच्छुक गॅसवर असल्याचे पहावयास मिळत आहे.
महापालिका निवडणुकीसाठी १२८ जागेसाठी ३२ प्रभागासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून बहुतांशी उमेदवारी अंतिम करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे अनेकांनी प्रत्यक्षात उमेदवारी अंतिम समजून प्रचार सुरु केला आहे. हे जरी खरे असले तरी ही भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचे असेल तर आपल्या मतदान दुफाळीचा फायदा युतीला होऊन द्यायचा नाही असा पवित्रा स्थानिक नेतृत्वाने व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने एकत्रित निवडणूक लढावी असा कार्यकर्त्यांचा रेटा आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी उपमुख्यमंत्री पवारांची भेट घेत एकत्रित निवडणुका लढण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी काही जागांची मागणी केली आहे.
तर महाराष्ट्राच्या राजकारणात एकत्रित निवडणुका लढल्याचा अनुभव असणाऱ्यांना पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस समितीने ही पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष योगेश बहल यांची भेट घेऊन दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस या सर्व पक्षानी निवडणुकीला युतीच्या विरोधात एकत्रित सामोरे जावे यासाठी प्रस्ताव ठेवला असून १२८ जगापैकी काही जागांची मागणी केली आहे.
यासाठी जागा कमी जास्त करून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट काँग्रेबरोबर आघाडी करण्यासाठी सकारात्मक असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तसेच उबाठा गट ही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत एकत्रित निवडणूक लढविण्यासाठी तयार असल्याची चर्चा सुरु आहे. या सर्वांशी खुद्द उपमुख्यमंत्री अजितदादा हे काही करून पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्ता पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे पहावयास मिळत आहे.
निवडणुका म्हंटल की कटुता विसरून, सत्ता मिळविण्यासाठी हेवेदावे बाजूला सारून पक्षीय राजकारण पुढे घेऊन जावे लागते हा इतिहास आहे. त्यामुळे अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुखांना तडजोडीच्या राजकारणासाठी काही जागा या मित्र पक्षाना सोडव्या लागणार असल्याने कोणत्या प्रभागात किती जागा द्याव्या लागणार, त्याठिकाणी अजितदादा गटाच्या कोणत्या इच्छुकचा बळी दिला जाणार अशा चर्चामुळे अनेक इच्छुक गॅसवर आहेत.
कोणकोणत्या जागावर मित्र पक्ष दावा करेल तेथील इच्छुकांच्या उमेदवारीवर टांगती तलवार असणार आहे. त्यामुळे अस्वस्थ असणाऱ्यांना काही इच्छुकांनी प्रमुख पदाधिकऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, काँग्रेस, आर पी आय व इतर मित्र पक्ष कोणत्या जागेवर दावा करू शकतात याची चाचपणी करून आमच्या उमेदवारीचे काय? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना विचारणे सुरु केल्याची चर्चा आहे.

