…अखेर ठरला माण-हिंजवडी मेट्रो सुरु होण्याचा मुहूर्त
- १५ जुलै पर्यंत नागरिकांसाठी मेट्रो सेवा होणार सुरु
- पी एम आर डी ए चे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांची माहिती
लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे
पुणेकरांची प्रतीक्षा अखेर संपणार असून अखेर माण हिंजवडी मेट्रो सुरु होण्याचा मुहूर्त ठरला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या मेट्रोची वाट पाहणाऱ्या नागरिकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे.
माण हिंजवडी ते बाणेर (रामनगर) या मार्गावरील पहिल्या टप्यातील सर्व प्रलंबित कामे जून अखेर पर्यंत पूणर करण्याचे आदेश देण्यात आले आहे.त त्यानंतर १५ जुलैपर्यंत या मार्गावर प्रवाशांसाठी मेट्रो सेवा सूर करण्याचे नियोजन आहे. पुढील टप्प्यात आगस्ट ही मेट्रो शिवाजीनगरपर्यंत विस्तारित करण्यात येणार असून त्यामुळे पुण्यातील वाहतूक कोंडीला मोठा दिलासा मिळणार आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ अभिजित चौधरी यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेत मेट्रो प्रकल्पाचा सविस्तर आढावा दिला. माण हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे काम अंतिम टप्यात पोहचले असून कघी तांत्रिक बाबी अजून प्रलंबित आहेत. पहिल्या टप्यातील १२ स्थानकांची १५ ते २० जून दरम्यान सुरक्षा आणि तांत्रिक तपासणी होणार आहे. या तपासणीनंतर आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतर मेट्रो सेवा सुरु करण्यात येणार आहे. साधारणपणे डिसेम्बर पर्यंत सर्व मेट्रो मार्गाची कामे पूर्ण करण्याचे नियोजन असून त्यानंतर सर्व ठिकाणी मेट्रो पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केली जाणार आहे.
उन्नत मेट्रो मार्गाने ही पकडली गती
प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर उर्वरित ११ स्थानकांचे काम वेगाने पूर्ण केले जाणार आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गावरील २३ स्थानकांचा समावेश असलेले २३.२ किलोमीटर लांबीचा संपूर्ण उन्नत मेट्रो मार्ग पुढील डिड ते दोन महिन्यात सुरु होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
हिंजवडी शिवाजीनगर मेट्रो सार्वजनिक खाजगी भागीदारी मॉडेल अंतर्गत विकसित करण्यात येत असून देशातील अशा प्रकारचा हा पहिला प्रकल्प असल्याचे मानले जात आहे.
या प्रकल्पत टाटा रियालिटी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि सिमेन्स प्रोजेक्ट व्हेंचर्स हे खाजगी भागीदार म्हणून सहभागी आहेत. एकूण २३.२ किलोमीटर लांबीच्या या कॉरिडॉरचा अंदाजे खर्च ८ हजार ३३१ कोटी रुपये इतका आहे.

