मुख्यंमत्री कोण ; भाजप वापरणार धक्कातंत्र ?
देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय अध्यक्ष ? मुरलीधर मोहळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ?
लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी (दिनांक २३ ) जाहीर झाला. त्यामध्ये महायुतीला २३६ जागा मिळाल्या. भाजपने १३२ जागा जिंकत महायुतीमध्ये मोठा भाऊ होण्याचा मान मिळाला. त्यामुळे मुख्यमंत्री पदी काही झाले तरी यावेळी भाजप आपला हक्क सांगितलं आहे. त्याला घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांनी न मागताच पाठिंबा देत भाजपच्या गुड बुकमध्ये जाण्याचा प्रयत्न केला आहे. तर मुख्यमंत्री पदासाठी आडून बसलेल्या शिवसेना एकनाथ शिंदे गटाला भाजप केंद्रीय नेतृत्वाने आपण यावेळी उपमुख्यमंत्री पद घ्या असा आदेश दिल्याने तो शिंदे गटाने मान्य केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. त्यामुळे मुख्यमंत्री भाजपचाच होणार हे ‘ काळ्या दगडावरील पांढरी रेष ‘ आहे.
परंतु निकाल लागून एक आठवडा उलटला तरी ही मुख्यमंत्री पदावर कोण बसणार याबाबत निश्चितीकरण होताना दिसत नाही. आर एस एस ने फडणवीस यांच्या नावाला हिरवा कंदील दाखविला आहे. पक्ष वाढीसाठी आणि सर्वसमावेशक निर्णयासाठी केंद्रीय भाजप नेतृत्व मुख्यमंत्री पदाबाबत धक्कातंत्राचा वापर करू शकते ? अशी चर्चा पक्षात आहे. पक्ष मोठा करण्यासाठी केंद्रीय नेतृत्व नव्या चेहऱ्यानं संधी देते हे मध्य प्रदेश आणि राजस्थान येथील निवडीवरून सिद्ध केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक असणारे देवेंद्र फडणवीस याना राष्ट्रीय अध्यक्ष पदावर प्रमोशन आणि मुख्यमंत्रीपदी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणाचे धडे गिरवीत असलेले केंद्रीय सहकार राज्यमंत्री पुण्याचे खासदार मुरलीधर मोहळ यांच्या नावाची ही चर्चा सुरु असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ आझाद मैदानावर होणार आहे. त्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. पाच डिसेंबर ला हा शपथविधी होणार आहे. या साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह मंत्री आणि महाराष्ट्राtil सर्वाधिकार असणारे अमित शहा यांच्यासह केंद्रातील अनेक मंत्री , खासदार यांचासह भाजप पक्ष संघटनेतील पदाधिकारी, आर एस एस मधील वरिष्ठ स्वयंसेवक , विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. आर एस एस ने फडणवीस यांच्या नावाला हिरवा कंदील दिल्यामुळे त्यांच्या नावाला सर्वाधिक पसंदी असल्याचे दिसत असले तरी भाजप पक्ष वाढीसाठी कोणतेही निर्णय होऊ शकतात. पक्षापुढे कोणी नाही, जरी कोणाचा ही कोणत्या ही पदावर हक्क असेल तरीही पक्षादेश मानून संबंधित व्यक्तीला त्या पदावर काम करावे लागते याची अनेक उदाहरणे भाजप मध्ये पाहावयास मिळतात. त्यामध्ये मध्य प्रदेश , राजस्थान याठिकाणी नवख्याना राज्याच्या प्रमुख पदावर बसविले होते.
भाजपमध्ये पक्षाच्या वर कोणीही नाही. त्याअनुषंगाने पक्षाच्या सर्वसमावेशक प्रगती आणि वाढीसाठी अनपेक्षित गोष्टी घडतात. त्या धर्तीवर मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासह आता पुण्याचे खासदार आणि अमित शहा यांच्या तालमीत तयार होत असणारे केंद्रीय सहकार आणि उड्डाण राज्यमंत्री पैलवान मुरलीधर मोहोळ यांच्या नावाबाबत ही विचार विनिमय सुरु असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. मोहोळ हे मराठा समाजाचे आहेत, ते आर एस एस चे स्वयंसेवक ही राहिले आहेत. राजकीय सुरुवात ही भाजपामधूनच केली. वॉर्ड सचिव ते प्रदेश सरचिटणीस आणि चार वेळा पुणे महापालिकेचे नगरसेवक, २०१९ ते २०२२ पुणे महापालिकेचे महापौर राहिले आहेत.
कोरोनाच्या काळात वाखाणण्याजोगे त्यांनी काम केल्याने केंद्रीय स्तरावर हि त्यांच्या कामाची दाखल घेण्यात आली होती. त्यामुळे ते पुण्याचे खासदार झाल्यानंतर पाहिल्याच टर्मला त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात अमित शहा कॅबिनेट मंत्री आहेत त्या सहकार खात्याच्या राज्यमंत्र्याचा पदभार त्यांना देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्र हा साखर पट्टा म्हणून ओळखला जातो. त्याची जबाबदारी ना. मोहोळ यांच्याकडे सोपविण्यात आली होती. विधानसभेच्या एकूण ५८ जागांपैकी महायुतीने मोठं यश मिळावीत ४६ जागा जिंकल्या.
महायुतीतील घटक पक्ष असणाऱ्या शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे एकनाथ शिंदे हे महायुतीचे मुख्यमंत्री होते. आता ते काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या पक्षाचा विधानसभा निवडणुकीमध्ये चांगला परफॉर्मेन्स राहिला आहे. परंतु भाजपने २०२४ विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा जिंकल्यामुले भाजपचा मुख्यमंत्री होणार आहे. शिंदे हे मराठा समाजाचे होते. ते आता नवीन इनींगमध्ये गृह मंत्रीपदासाठी अडून बसले आहेत. त्याअगोदर काही काळ मुख्यमंत्री पद द्या यासाठी ते आग्रही होते. परंतु भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांना याबाबत राजी (आदेश ?) करीत, मुख्यमंत्री हा भाजपचाच होणार असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा मोह सोडल्याचे दिसत आहे.
त्यामुळे भाजप ने पक्ष वाढीसाठी सर्वसमावेशक निर्णय घेतला तर मुख्यमंत्री पदाची मनिषा बाळगून असणारे देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय नेतृत्वाने आदेश दिल्यास राष्ट्रीय अध्यक्ष पदावर विराजमान होऊ शकतात आणि ते ज्या जागेसाठी तीव्र इच्छुक आहेत अशा मुख्यमंत्री पदावर केंद्रीय राज्य सहकार मंत्री मुरलीधर मोहोळ यांची वर्णी लागू शकते अशी विश्वसनीय वृत्त आहे. या सर्व शक्यता असल्याने फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत यासाठी महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघातील मंदिरामध्ये होम हवन, देवाला साकडे घालण्यात येत असल्याचे पाहावयास मिळत आहे. त्याअनुषंगाने पाच डिसेंबर ला आझाद मैदानावर मुख्यमंत्री म्हणून कोण शपथविधी घेणार याकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.