सामाजिक उपक्रमांनी विलास मडिगेरी यांचा वाढदिवस साजरा
राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छा..!
वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा
लोकमान्य टाइम्स : पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तथा भाजपचे शहर सरचिटणीस विलास मडिगेरी यांचा वाढदिवस शुक्रवारी (दि.५) विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, अन्नदान, आर्थिक मदत, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि करियर मार्गदर्शन असे उपक्रम सलग १९ वर्षापासून राबविण्यात येत आहे.
यावेळी भोसरी विधानसभेचे भाजप आमदार महेश लांडगे, ज्येष्ठ उद्योजक विजय जगताप, भाजपा दक्षिण भारत आघाडी प्रदेशाध्यक्ष राजेश पिल्ले, प्रदेश सदस्य महेश कुलकर्णी, कामगार नेते सचिन भैय्या लांडगे,वैशाली खाडये, पीएमपीएमएलचे व्यवस्थापक सतीश गव्हाणे नेहरूनगर डेपोचे व्यवस्थापक दहातोंडे संतोष लांडगे उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी नगरसेवक रवी लांडगे, रणजीत कलाटे, प्रदीप तापकीर, योगेश लांडगे, राहुल लांडगे, माऊली जगताप, शिवराज लांडगे, उद्योजक विलास भाबुर्डेंकर, व्यंकटराव शिंदे, नेताजी घारे, चंद्रकांत देशमुख, शिवकुमार आग्रे, राजेंद्र जगताप, प्रवीण जोशी, गजान गुळवे, यशवंत गुंजाळ, संतोष नायर, उदय कदम,नाना राऊत यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व असंख्य नागरिकांनी विलास मडिगेरी यांना भेटून शुभेच्छा दिल्या.
इंद्रायणीनगर येथील सेक्टर १ चैतन्य पार्क परिसरात पीसीएमसी उद्यान अधिक्षक श्री राजेश वसावे आणि विलास मडिगेरी कॉलनीतील मान्यवरांच्या यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी २ वर्षा पुढील १०० वृक्ष लावण्यात आले.
डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पीटल रक्तपेढी व वायसीएम रुग्णालय रक्तपेढी तसेच लाईफ लाईन ब्लड सेंटर यांच्या सहकार्याने रक्तदान शिबीर घेण्यात आले. यामध्ये २८० रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन भोसरी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन फटांगरे यांच्या हस्ते झाले.
यासह भोसरीतील पताशीबाई लुंकड अंधशाळा, महापालिका वैष्णोमाता प्राथमिक शाळा, गुळवेवस्ती येथील यशवंतराव चव्हाण आश्रमशाळा येथे अन्नदान करण्यात आले तर, पांजरपोळ गोशाळेला चारा व गूळ दान करण्यात आले. श्री साई चौक मित्र मंडळ व श्री विलासभाऊ मडिगेरी प्रतिष्ठान, श्री वैष्णोमाता मंदिर समितीचे सर्व पदाधिकारी, युवा कार्यकर्ते यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिध्द निवेदक भाऊसाहेब कोकाटे यांनी तर आभार धनंजय जाधव यांनी मानले.
…..तर विधानसभेसाठी विलास मडिगेरी यांचा विचार करावा लागेल : भाजप प्रदेश सदस्य महेश कुलकर्णी
विलास मडिगेरी यांनी नेहमी जनतेच्या प्रश्ना प्रती कार्यरत राहण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे विलासच्या वाटचालीचा साथीदार होण्याचे काम आपणांस करावे लागेल. सचिन भैय्या म्हणाले तसे ते नेहमी हसतमुख राहणारे व्यक्तिमत्त्व आहे. ते सातत्याने जनतेच्या पाठिंब्यावर कार्यरत असतात . त्यामुळे भविष्यात त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपल्याला त्यांच्या पाठीमागे सर्वांनी खंबीरपणे उभा राहावे लागणार आहे असे आवाहन भाजप प्रदेश सदस्य व ज्येष्ठ नेते महेश कुलकर्णी यांनी यावेळी केले.
महापालिकेत तीन वेळा प्रवेश करून ४ थ्यांदा झेप घेत स्थायी समिती अध्यक्ष पदापर्यंत मजल मारली आहे. भोसरी विधानसभेत महेशदादा आमदार आहेतच. त्यांच्या जागेवर विलास याने जावे असे आम्ही म्हणणार नाही; परंतु भोसरी मतदारसंघाच्या दोन विधानसभा झाल्या तर दुसऱ्यासाठी विलास मडिगेरी यांचा भविष्यात विचार करावा लागेल असे प्रतिपादन महेश कुलकर्णी यांनी करीत भविष्यातील वाटचालीसाठी विलास मडिगेरी यांना शुभेच्छा दिल्या.
गुणवंत विद्यार्थी व पालकांसाठी करिअर मार्गदर्शन…
ज्या दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ३८० मुलांचे सन्मान करण्यात आला. ते विद्यार्थी व त्यांचे पालक यांच्यासाठी करिअर बदल्या वाटा आणि संधी या विषयावर डॉ. संतोष मचाले यांनी व्याख्यान द्वारे मार्गदर्शन केले. दहावी, बारावीनंतरच्या करियरच्या संधी शोधून भविष्यामध्ये पुढे जायचे असेल, तर गुणवत्तेवर काम करावे लागेल. यशासाठी करियरच्या अनेक वाटा आहेत. त्या समजून घेण्याची आणि पालकांनी जागे होण्याची गरज आहे. मुलांमधील गुण ओळखा आणि त्यानुसार त्याच्या शिक्षणावर खर्च करा. त्यांना कौशल्ये आत्मसात करू द्या, असे आवाहन डॉ. संतोष मचाले यांनी केले.