महाराष्ट्र

भुजबळांना फडणवीस बळ देतात

  • मनोज जरांगेंची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका
  • भुजबळांना तेवढ्यासाठीच मंत्रीपद दिले का ? जरांगेंचा सवाल
  • त्रास देणाऱ्यांना निवडून येऊ देत नाही

लोकमान्य टाइम्स : ऑनलाईन

छगन भुजबळांना देवेंद्र फडणवीस बळ देतात हे जनतेच्या लक्षात आले आहे, भुजबळांना तेवढ्यासाठीच मंत्रीपद दिले आहे का? असा सवाल मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी नांदेडमध्ये उपस्थित केला आहे.

दरम्यान मनोज जरांगे पाटील बोलताना पुढे म्हणाले की, मराठ्यांचे दोन चार माकडं फडणवीस यांच्या बाजूने बोलतात. त्यामुळे समाजात नाराजी आहे. राज्यातील मराठा आता मुलांना न्याय देण्यासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. आम्ही आमच्या मुलांच्या न्यायासाठी का रस्त्यावर येऊ नये?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

सरसकटच्या अध्यादेशाने यांचे फार पोट दुखते

जरांगे पाटील म्हणाले, मंत्री म्हणतात हे आरक्षण टिकणार नाही म्हणजे आरक्षण हेच देणार आणि उडवणार हेच म्हणजे सगेसोयरे अंमलबजावणी हे देणार आणि आणखी उडवणार हे नक्की आहे. सरसकट च्या अध्यादेशाने यांचे फार पोट दुखते, सगेसोयरे अंमलबजावणी यांनीच द्यायची आणि टिकवायची जबाबदारी सुद्धा यांचीच राहील आम्हाला गॅझेट सुद्धा लागू पाहिजे. मराठ्यांचे तीन चार माकड फडणवीस यांच्या बाजूने बोलतात. त्यामुळे समाजात नाराजी आहे.

मराठ्याना त्रास देणाऱ्याना निवडून येऊ देत नाही

पावसात देखील मराठे रॅलीत येणार आहेत कारण आमची आरक्षण ही वेदना आहे. काम बंद ठेऊन रॅलीत या. मराठ्याना त्रास देणाऱ्याना निवडून येऊ देत नाही. मराठाच राज्यात किंग राहिला पाहिजे. पाडा म्हणण्यात खूप ताकद आहे. दोन तीन टप्पे होऊ द्या मग बाँबच फोडणार, असा गौप्यस्फोट मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

प्रवेशावेळी घेतलेले प्रवेश शुल्क परत करा

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना मी चार पाच दिवसांपूर्वी बोललो होतो. मुलींसाठी १०० टक्के शिक्षण केले होते. त्याची अंमलबजावणी केली असेल तर त्यांचे अभिनंदन. सगळ्यांच्या लेकींना त्यांच्यामुळे न्याय मिळाला त्याबद्दल सरकारचे कौतुक पण प्रवेश घेताना जी मुलींचे प्रवेश शुल्क घेतले आहे ते करावे असे आवाहन ही जरांगे यावेळी सरकारला केले आहे.