पुणे

जमीर गुलाब कोतवाल यांना डॉक्टरेट (पीएचडी)

वनस्पती पानांचे रोग शोधणे आणि वर्गीकरण या विषयावर त्यांचा शोध प्रबंध

लोकमान्य टाइम्स : पिंपरी चिंचवड

अमिटी स्कूल ऑफ इंजिनीरिंग अँड टेकनॉलॉजि, अमिटी युनिव्हर्सिटी छत्तीसगढ येथून कॉम्पुटर सायन्स इंजिनीरिंग मधून जमीर गुलाब कोतवाल यांनी डॉक्टरेट (पीएचडी) पदवी मिळविली आहे. डॉ. जमीर कोतवाल हे मुळ गौडगांव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथील रहिवाशी असून सद्या ते मोशी, पिंपरी चिंचवड येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास आहेत.

सखोल शिक्षणावर आधारित वनस्पती पानांचे रोग शोधणे आणि वर्गीकरण या विषयावर डॉ .जमीर कोतवाल यांनी शोधप्रबंध सादर केला होता. हा प्रबंध पूर्ण करण्यासाठी त्यांना डॉ .रामगोपाल कश्यप (अमिटी युनिव्हर्सिटी छत्तीसगड ) यांचे मागदर्शन लाभले . तसेच सह-मागदर्शन डॉ .पठाण शफी (एम.आई. टी एडीटी युनिव्हर्सिटी )यांचे मागदर्शन लाभले.

डॉ. जमीर कोतवाल यांनी डॉक्टरेट (पीएचडी ) संशोधन दरम्यान एक पेटंट आणि ५ आंतरराष्ट्रीय संशोधन पेपर प्रकाशित केले.त्यांना मिळालेल्या या यशाबद्दल सर्वच स्थरतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या यशानंतर त्यांनी आपले आई-वडील, भाऊ , बायाको,मुले, आपले कुटुंब आणि मित्र मंडळांना सहकार्य केला बदल आभार मानले.