पिंपरी चिंचवडपुणे

अजित गव्हाणे यांच्यासह २८ पदाधिकाऱ्यानी केला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

  • पुण्यातील मोदीबागेत आज शरद पवार यांच्या उपस्थित झाला प्रवेश
  • विलास लांडे यांची अनुपस्थित
  • विलास लांडे यांच्या मार्गदर्शनाखालीच प्रवेश करत असल्याचा अजित गव्हाणे यांची माहिती
  • राष्ट्रवादी काँग्रेस सह भाजपतील अनेक नाराज माजी नगरसेवक प्रवेश करणार असल्याचं अजित गव्हाणे यांचा मोठा दावा

लोकमान्य टाइम्स : पिंपरी चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी मंगळवारी (दि. १६) राजीनामा दिला होता. ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार यावर शिक्कामोर्तब झाले होते. त्यानुसार गव्हाणे यांच्यासह जवळपास २८ पदाधिकारी यांनी आज पुण्यातील मोदीबागेत शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी ज्येष्ठ नेते आझम पानसरे, शहराध्यक्ष तुषार कामठे उपस्थित होते. परंतु या प्रवेशा दरम्यान माजी आमदार विलास लांडे यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय होता.

विलास लांडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखालीच हा निर्णय घेतला आहे : अजित गव्हाणे

याबाबत बोलताना अजित गव्हाणे म्हणाले की, आम्ही माजी आमदार विलास लांडे पाटील यांच्याच नेतृत्वाखाली अनेक वर्षे काम करीत आहे. ते आमच्याबरोबर आहेत. त्यांचे मार्गदर्शन घेऊन आम्ही हा निर्णय घेतला आहे. मला २०१९ मध्येच पक्षाकडून भोसरी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढण्याची विचारणा झाली होती ; परंतु विलास लांडे हे ती निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याने मी त्यावेळी शांत राहिलो. त्यावेळी मी ही इच्छुक होतो. आता मी भोसरी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छूक आहे. आणि मी विलास लांडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढणार आहे. पवार साहेब जो आदेश देतील त्याप्रमाणे भविष्याची वाटचाल करणार असल्याचे ही त्यांनी यावेळी जाहीर केले.

शरद पवार गटात प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्याची नावे पुढील प्रमाणे :

  1. माजी महापौर वैशालीताई घोडेकर
  2. माजी नगरसेवक पंकज भालेकर
  3. माजी नगरसेवक प्रवीण भालेकर
  4. माजी नगरसेविका संगीता ताम्हाणे
  5. दिवंगत नगरसेविका पौर्णिमा सोनवणे यांचे पती रवी सोनवणे
  6. दिवंगत नगरसेवक दत्ता काका साने यांचे पुत्र यश साने
  7. माजी नगरसेवक संजय नेवाळे
  8. माजी नगरसेवक वसंत बोराटे
  9. माजी नगरसेवक विनया तापकीर
  10. शहर जिल्हा कार्याध्यक्ष मा विरोधी पक्षनेते राहुल भोसले
  11. माजी नगरसेवक समीर मासुळकर
  12. माजी नगरसेवक गीता मंचरकर
  13. माजी नगरसेवक संजय वाबळे
  14. माजी नगरसेविका वैशालीताई उबाळे
  15. माजी नगरसेविका शुभांगी ताई बोराडे
  16. युवा नेते प्रदीप तापकीर
  17. माजी नगरसेविका अनुराधा गोफने
  18. माजी नगरसेवक घनश्याम खेडेकर
  19. युवक राष्ट्रवादी भोसरी विधानसभा अध्यक्ष सागर बोराटे
  20. शिक्षण मंडळाचे माजी सभापती निवृत्ती मामा शिंदे
  21. माजी नगरसेवक तानाजी खाडे
  22. माजी नगरसेवक शशिकीरण गवळी
  23. विशाल आहेर
  24. युवराज पवार कामगार आघाडी
  25. विशाल आहेर सरचिटणीस पिंपरी चिंचवड शहर जिल्हा
  26. नंदूतात्या शिंदे
  27. शरद भालेकर