बातम्या

मोशी बारणे वस्ती येथील उद्यान आणि क्रीडांगणास परवानगी; त्वरित काम सुरू करण्यास आयुक्तांना करणार सूचना पार्थ पवार यांनी व्यक्त केला विश्वास

  • बारणे वस्ती येथील महापालिका आरक्षित जागेला दिली पार्थ पवार यांनी भेट
  • परिसरातील रहिवाशांनी अतिश बारणे यांच्या नेतृत्वाखाली साधला पार्थ पवार यांच्याशी संवाद
  • माझी लाडकी बहिण योजना च्या अनुषंगाने परिसरातील महिलांनी पार्थ पवारांना पुष्पगुच्छ देवून अजितदादा यांच्या प्रती व्यक्त केली कृतज्ञता
  • ज्येष्ठ नागरीक आणि महिलांनी उद्यानात विरुंगळा केंद्र, मंदिर उभा करण्याची केली मागणी

लोकमान्य टाइम्स : मोशी

बोऱ्हाडेवाडी, मोशी येथील बारणे पाटील चौक परिसरातील गट क्रमांक २३० (१३४७) येथील ६४ गुंठ्यावर महापालिकेचे आरक्षण आहे. येथे होणाऱ्या उद्यान, क्रीडांगणच्या कामाच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ अजितदादा पवार यांनी शहर उपाध्यक्ष अतिश बारणे यांच्या माध्यमातून भेट दिली. यावेळी परिसरातील जवळपास २७ सोसायट्यांच्यांमध्ये राहणाऱ्या रहिवाशी यांच्या मागणीच्या अनुषंगाने ज्येष्ठ नागरीक, महिला आणि विविध सोसायटीतील रहिवाश्यांनी पार्थ पवार यांच्याशी संवाद साधला.

हे काम त्वरित सुरू करण्याच्या अनुषंगाने आयुक्तांना आदेश देण्यात येतील असे स्पष्ट केले. तसेच ज्येष्ठ नागरीक, महिलांनी समस्या मांडल्या त्या सोडविण्यासाठी ही प्राधान्य देण्यात येईल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी परिसरातील महिलांनी माझी लाडकी बहिण योजना राज्य सरकारने राबविल्यामुळे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून पार्थ पवार यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानले.

माझी लाडकी बहिण योजना सुरू केल्याबद्दल राज्य सरकार व त्याअनुषंगाने अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टीने पार्थ अजितदादा पवार यांचे पुष्पगुच्छ देवून आभार मानले. यावेळी शहर उपाध्यक्ष अतिश बारणे, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा प्रा.कविता आल्हाट व इतर पदाधिकारी उपस्थित होते

बुधवारी (दिनांक २८) पार्थ अजितदादा पवार यांनी मोशी येथील बारणे पाटील चौक परिसरातील महापालिका आरक्षित जागेला भेट दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या शहराध्यक्ष प्रा. कविता आल्हाट , अक्षय बारणे , राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व ज्येष्ठ नागरीक,महिला, विविध सोसायटी मधील रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पार्थ पवार यांनी सर्व वयोगटातील रहिवाशांना वेळ देत त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी महापालिकेच्या आरक्षित जागेवर उद्यान, क्रीडांगण याबरोबर विरुंगळा केंद्र,मंदिर , जॉगिंग ट्रॅक उभा करण्यासाठी आपण आयुक्तांशी बोलावे अशी मागणी करण्यात आली. या मागणीला पार्थ पवार यांनी हिरवा कंदील देते याबाबत आयुक्तांशी चर्चा करून त्यादृष्टीने सकारात्मक निर्णय होईल असा विश्वास व्यक्त केला.

परिसरातील विविध समस्या मांडताना सोसायटी रहिवाशी

बोऱ्हाडेवाडी, मोशी येथील बारणे पाटील चौक परिसरातील गट क्रमांक २३० (१३४७) येथील ६४ गुंठ्यावर महापालिकेचे आरक्षण आहे. याठिकाणी महापालिकेच्या वतीने कचरा संकलन केंद्र उभा करण्यात येणार होते. त्याला येथील स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध केला होता. त्याअनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष अतिश बारणे यांनी स्थानिक नागरिकांना बरोबर घेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर अजितदादा पवार यांनी नागरिकांचा विरोध असेल तर याठिकाणी कचरा संकलन केंद्र उभा करू नये असे आदेश आयुक्त शेखर सिंग यांना दिले होते. त्यानंतर आयुक्तांनी येथील कचरा संकलन केंद्र रद्द करून याठिकाणी परिसरातील नागरिकांच्या मागणीच्या अनुषंगाने उद्यानाचे आदेश दिले होते.