महाराष्ट्र

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत महाराष्ट्रात १ कोटी ४७ लाख ४२ हजार ४७६ अर्ज पात्र

एकूण २ कोटी ६ लाख १४ हजार ९९० अर्ज प्राप्त

३१ जुलै पर्यंत अर्ज करणाऱ्या अर्जांची पडताळणी

पात्र महिलांना देण्यात लाभ

३१ जुलै नंतर आलेल्या अर्जांची छाननी सुरू

सप्टेंबर महिन्यात उर्वरित पात्र महिलांना मिळणार लाभ

लोकमान्य टाइम्स : ऑनलाईन

महाराष्ट्र सरकारनं सुरु केलेल्या लाडकी बहिण योजनेची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. मोठ्या प्रमाणात महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे. राज्यातील कोट्यावधी महिलांना याचा लाभ मिळाला आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत देणार आहे. दरम्यान, आतापर्यंत राज्यभरातून या योजनेसाठी २ कोटी ६ लाख १४ हजार ९९० अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी १ कोटी ४७ लाख ४२ हजार ४७६ अर्ज पात्र ठरले आहेत.

३१ जुलै पर्यंतच्या १ कोटी ४७ लाख ४२ हजार ४७६ अर्ज पात्र
अर्जांची पडताळणी प्रक्रिया सातत्याने सुरु आहे. ३१ जुलै पर्यंत ज्या महिलांनी अर्ज केला होता, त्या पात्र महिलांना लाभ देण्यात आला आहे. ३१ जुलैनंतरच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सुरु आहे. आत्तापर्यंत राज्यभरातून या योजनेसाठी २ कोटी ६ लाख १४ हजार ९९० अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी १ कोटी ४७ लाख ४२ हजार ४७६ अर्ज पात्र ठरले आहेत. तर ४२ हजार ८२३ अर्जाची पडताळणी सुरु आहे.
सप्टेंबर महिन्यात उर्वरित पात्र महिलांना मिळणार लाभ

सप्टेंबर मध्ये पडताळणीत मिळणार लाभ

आतापर्यंत कोट्यवधी महिलांच्या बँक खात्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दोन महिन्यांचे ३००० रुपये आले आहेत. ३१ जुलैपर्यंत फॉर्म भरलेल्या आणि पात्र ठरलेल्या महिलांना हे ३००० रुपये देण्यात आले आहेत. आता ३१ जुलैनंतर आलेल्या फॉर्मची छाननी चालू आहे. सप्टेंबर महिन्यात उर्वरित पात्र महिलांना एकूण तीन महिन्यांचे पैसे दिले जातील. म्हणजेच पात्र महिलांना तीन महिन्यांचे ४५०० रुपये मिळतील.


पैसे जमा न झाल्यास कुठे कराल तक्रार?

लाडकी बहीण योजनेचा अर्ज करताना महिलांना अनेक अडचणी येत आहेत. काही महिलांचे अर्ज मंजूर होताना अडचणी येत आहेत. अशा अडचणी येत असतील तर महिलांनी कुठे तक्रार करावी? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर काही अडचणी येत असतील तर त्या नारी शक्तीदूत ॲपवर त्याबाबत तक्रार करू शकतात. यासह महिला स्थानिक अंगणवाडी केंद्रावर जाऊन अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून त्यांची अडचण सरकारदरबारी मांडू शकतात. दरम्यान, या योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रतिमहिना १५०० रुपयांची मदत केली जात आहे. या योजनेसाठी पात्र ठरलेल्या काही महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे ३००० रुपये मिळाले आहेत.