ॲड.नितीन लांडगेंच्या माणुसकीच्या दर्शनामुळे ताटातूट झालेल्या माय लेकिंची झाली भेट
- बिहारची चार वर्षाची तृप्ती पाल आईच्या कुशीत विसावली
- पाल कुटुंब लग्न समारंभासाठी आले होते आदिनाथनगर मध्ये
लोकमान्य टाइम्स : भोसरी
बिहारवरून लग्न समारंभासाठी भोसरी येथे आलेल्या पाल कुटुंबातील चार वर्षाची तृप्ती घरातून खाऊ आणण्यासाठी गेली असता पुन्हा घराचा रस्ता न सापडल्याने चुकली होती. घर न सापडल्याने एकच रस्त्यावरून ती घाबरलेल्या अवस्थेत फिरत असल्याचे पाहून एका सजग नागरिकांने त्या छोट्या मुलीला स्थायी समितीचे माजी अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांच्या जनसंपर्क कार्यालयात सोडले. ॲड.लांडगे यांनी माणुसकीच्या दर्शन घडवीत त्या चुकलेल्या छोट्या मुलीला आईची कुशीत विसविण्यास सिंहाचा वाटा उचलला. काही तास आपली लेक आपल्या डोळ्यासमोरून दूर झाल्यावर होणारी बैचेनी आणि त्यानंतर काही वेळाने ती आपल्या खुशीत सुखावल्याचा आनंद , मुलगी आणि आईची भेट त्यानंतर आईच्या डोळ्यातील आश्रूना मिळालेली मोकळी वाट पहाता उपस्थितांना हा आनंदोत्सव प्रत्यक्षात पाहावयास मिळाला.
आदिनाथनगर येथे अजय पाल आपल्या कुटुंबासह तीन दिवसापूर्वी लग्नासाठी आले होते. सोमवारी (दिनांक २) लग्नाच्या गडबडीत चार वर्षाच्या तृप्तीकडे लक्ष देण्यास थोडा विलंब झाला. खाऊसाठी दिलेले पैसे घेऊन ती सरळ मुख्य रस्त्यावर आली. खाऊ घेतल्या नंतर ती घराचा रस्ता विसरली. दरम्यान ती आदिनाथनगर ते लांडेवाडी या रस्त्यावर घर सापडत नसल्याने फिरत होती. ही मुलगी बहुदा रस्ता चुकली आहे हे लक्षात आल्यानंतर एका जागृत नागरिकाने तिला दुपारी दोनच्या दरम्यान माजी स्थायी समिती अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांच्या लांडेवाडी येथील जनसंपर्क कार्यालयात आणून सोडले.
घर सापडत नसल्याने आणि सर्वच अनोळखी व्यक्ती यामुळे चार वर्षाची ती मुलगी घाबरलेली होती. ही गोष्ट नितीन लांडगे यांच्या लक्षात आल्यानंतर तिला त्यांनी खाऊ दिला. तिच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करीत तिला आधार देत आपलेसे करत तिला बोलत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान ती मुलगी रडल्यामुळे आणि भेदरल्यामुळे लांडगे यांच्या जनसंपर्क कार्यालयात झोपी गेली. एक ते दिड तास झोप घेतल्यानंतर ती जागी झाली.
दरम्यान त्या काळात नितीन लांडगे यांनी या मुलीचे फोटो समाज माध्यमावर टाकून संबंधितांनी माजी स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांच्या जनसंपर्क कार्यालयात संपर्क करण्याचे आवाहन केले. एवढ्या वरच न थांबता आदिनाथनगर ते लांडेवाडी दरम्यान ती मुलगी फिरत होती असे त्या नागरिकांनी सांगितल्यामुळे या मार्गावरील विविध सोसायटीमध्ये कार्यकर्त्यांना पाठवून या मुलींबाबत माहिती घेण्यास सुरुवात केली.
याबाबत पोलीस ठाण्यात ही माहिती कळविली. नितीन लांडगे यांचे मित्र आदिनाथनगर मध्ये राहतात. त्यांना माहित होते की, त्याठिकाणी पाल कुटुंब राहत आहे. त्यांनी आदिनाथ नगरमध्ये त्यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा तृप्ती त्यांच्या घरातील असल्याची माहिती मिळाली. भोसरी पोलीस ठाण्याचे हवालदार सुहास भोस आणि मोहन पवार हे लांडगे यांच्या कार्यालयात पोहचले. तेव्हा तृप्तीची आई राणी पाल आणि तिचा मामा पोहचले.
पोलिसांनी ओळख पटवून तृप्तीला तिच्या आईकडे सुपूर्द केले. त्यावेळी तृप्ती तिच्या आईला बिलगली. त्यावेळी मुलगी आणि आईची भेट होताच दोघींच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. तृप्तीची आई तृप्ती मिळाल्यामुळे ॲड. नितीन लांडगे आणि सहकाऱ्यांचे वारंवार आभार मानताना दिसत होत्या.