महाराष्ट्रमुंबईराजकीय

देवेंद्र फडणवीस गडचिरोली, एकनाथ शिंदे ठाणे व मुंबई शहर तर अजित पवार यांच्याकडे पुणे आणि बीड चे पालकमंत्रीपद

धनंजय मुंडे यांचा पत्ता कट ; पंकजा मुंडे यांच्याकडे जालन्याची जबाबदारी

लोकमान्य टाइम्स : मुंबई

अखेर आज (शनिवारी दि. १८) विविध जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे व मुंबई शहरचं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्हा आणि बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. मंत्री धनंजय मुंडे यांना या यादीतून वगळण्यात आल्याने मुंडे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. तर पंकजा मुंडे यांना जालना जिल्ह्याचे पालकमंत्री पद बहाल करण्यात आले आहे.

आदरणीय दादांच्या नेतृत्वात बीड जिल्हाच्या विकासाला पुणे जिल्ह्याप्रमाणे अधिकची गती आणि चालना मिळेल : धनंजय मुंडे

पालकमंत्र्यांची यादी पुढील प्रमाणे :

क्र.जिल्हापालकमंत्रिपद
१)गडचिरोलीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सह.आशिष जयस्वाल
२) व ३)ठाणे आणि मुंबई शहरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
४) व ५)पुणे आणि बीडउपमुख्यमंत्री अजित पवार
६) व ७)नागपूर आणि अमरावतीचंद्रशेखर बावनकुळे
८)अहिल्यानगरराधाकृष्ण विखे पाटील
९)नाशिकगिरीश महाजन
१०)वाशिमहसन मुश्रीफ
११)सांगलीचंद्रकांत पाटील
१२)जळगावगुलाबराव पाटील
१३)यवतमाळसंजय राठोड
१४)मुंबई उपनगरआशिष शेलार व सह.मंगलप्रभात लोढा
१५)रत्नागिरीउदय सामंत
१६)धुळेजयकुमार रावल
१७)जालनापंकजा मुंडे
१८)नांदेडअतुल सावे
१९)चंद्रपूरअशोक ऊईके
२०)साताराशंभुराजे देसाई
२१)रायगडअदिती तटकरे
२२)सिंधुदुर्गनितेश राणे
२३)लातूरशिवेंद्रसिंहराजे भोसले
२४)नंदुरबारमाणिकराव कोकाटे
२५)सोलापूरजयकुमार गोरे
२६)हिंगोलीनरहरी झिरवाळ
२७)भंडारासंजय सावकारे
२८)छत्रपती संभाजीनगरसंजय शिरसाट
२९)धाराशीवप्रताप सरनाईक
३०)बुलढाणामकरंद जाधव
३१)अकोलाआकाश फुंडकर
३२)गोंदियाबाबासाहेब पाटील
३३)कोल्हापूरप्रकाश आबिटकर, सह, माधुरी मिसाळ
३४)वर्धापंकज भोयर
३५)परभणीमेघना बोर्डीकर
३६)पालघरगणेश नाईक