पंकजा मुंडे, सदाशिव खोत, परीणय फुके, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे विधान परिषदेवर
- पाच जण ही होणार बिनविरोध आमदार
- पंकजा मुंडे यांचे पुनर्वसन
- भाजप कडून सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग
लोकमान्य टाइम्स : मुंबई
महाराष्ट्र विधान परिषदेसाठी ११ जागा रिक्त झाल्या आहेत. त्याअनुषंगाने भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला पाच जागा आल्या होत्या. त्याअनुषंगाने भाजप प्रदेशाने केंद्र निवड समितीकडे पाठविलेल्या दहा नावांपैकी पाच नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामध्ये पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परीणय फुके, अमित गोरखे यांना तर मित्रपक्ष म्हणून रयत क्रांती संघटनेचे नेते सदाशिव खोत यांच्या नावावर केंद्रीय निवड समितीने विश्वास व्यक्त करीत सोशल इंजिनिअरिंग प्रयोग यशस्वी केला आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीची पिछेहाट झाली. महायुतीला फक्त १७ जागेवरच समाधान मानावे लागले. त्यामुळे येवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा परफॉर्मन्स सुधारण्यासाठी जुलै महिन्यात विधान परिषद निवडणूक जाहीर झाली आहे. त्याअनुषंगाने महायुतीने कंबर कसली आहे. रिक्त झालेल्या ११ जागेच्या अनुषंगाने महायुतीत भाजप लां सुटलेल्या पाच जागा ह्या बिनविरोध होणार ही काळ्या दगडावरील पांढरी रेष आहे.
त्याअनुषंगाने भाजप ने महाराष्ट्रातील १० जणांची यादी केंद्रीय निवड समितीकडे पाठविली होती. त्यामध्ये पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील, रावसाहेब दानवे, परीणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे, महादेव जानकर यां प्रमुख पदाधिकारी यांचा समावेश होता. त्याअनुषंगाने सोमवारी (दिनांक १ जुलै) भाजपा केंद्रीय निवड समितीने विधान परिषदेसाठी नावे जाहीर केली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने पंकजा मुंडे यांचे नाव येते.
बीडमधून पंकजा मुंडे
बीड लोकसभा मतदार संघातून पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी भाजप कडून प्रयत्न सुरू होते. त्यांना राज्यसभेवर पाठविण्यात येणार अशी चर्चा असतानाच त्यांचे नाव विधान परिषदेसाठी भाजप कडून त्यांना देण्यात आले . त्या महराष्ट्रातील ओ बी सी समजाच्या हेविवेट नेत्या असल्याने त्यांचे पुनर्वसन भाजप च्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याने विधान परिषदेवर संधी देण्यात आल्याची चर्चा आहे.
पुणे पिंपरी चिंचवडमध्ये टिळेकर आणि गोरखे
पुणे , हडपसर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार आणि ज्यांनी प्रदेश संघटनेत उत्तम काम करून आपल्या कामाचा ठसा उमटविणारे योगेश टिळेकर यांच्या नावाला ही केंद्रीय निवड समितीने हिरवा कंदील दिला आहे. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड शहरातील अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि महारष्ट्र प्रदेश सचिव अमित गोरखे यांना ही विधान परिषदेवर संधी देण्यात आली आहे.
साखर पट्ट्यात सदाभाऊ खोत यांना संधी
तसेच महायुतीतील मित्र पक्ष असणाऱ्या रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी राज्यमंत्री व शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असणारे , काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मतदारसंघातील सदाशिव खोत याच्या नावावर ही शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीत प. महाराष्ट्रात महायुतीला फटका बसला होता. त्याअनुषंगाने साखर पट्ट्यात शेतकऱ्यांचा लढा उभा करणारे सदाभाऊ खोत यांना भाजप च्या गोटातून संधी देण्यात आली आहे.
भंडारा गोंदिया विभागातून परिणय फुके
तसेच माजी मंत्री आणि भंडारा गोंदिया विभगतून येणारे परीणय फुके यांनी ही जुना अनुभव असल्याने त्यांना ही संधी देण्यात आली आहे. केंद्रिय निवड समितीने या पाच नावावर शिक्कामोर्तब केल्यामुळे यांची निवड ही बिनविरोधच होणार आहे. फक्त त्याअनुषंगाने सोपस्कार प्रक्रिया बाकी आहे.