पिंपरी चिंचवड

सोसायटीधारकांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध : आ.महेश लांडगे

  • सोसायटी फेडरेशनच्या ‘महासंमेलन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकमान्य टाइम्स : भोसरी

माझ्या संघर्षाच्या काळात सोसायटीधारक नागरिकांनी मला साथ दिली. त्यांच्या समस्या आणि अडचणी सोडवण्यासाठी कायम कटिबद्ध राहीन. रक्ताची नाती नसतानाही ही आपुलकीचे नाते तयार झाले. विधानसभा निवडणुकीत सोसायटीधारकांच्या मदतीमुळेच मी विजयाची ‘हॅट्रिक’ करु शकलो. याबाबत सोसायटीधारकांसोबत कृतज्ञता व्यक्त करतो, अशा भावना भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केल्या. 

चिखली-मोशी-चऱ्होली-पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनच्या माध्यमातून शहरातील सोसायटीधारकांसाठी ‘‘महासंमेलन-2025’’ आयोजित करण्यात आले. यावेळी आमदार लांडगे बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे, सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांच्यासह फेडरेशनचे पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येत सोसायटीधारक उपस्थित होते. विशेष म्हणजे, ‘‘जय जय महाराष्ट्र माझा..’’ हे महाराष्ट्र गीत गाऊन आमदार महेश लांडगे यांनी उपस्थित सोसायटीधारकांची मने जिंकली. 

पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी मनोगतात फेडरेशनच्या कामाचे आणि त्यांच्या एकजुटीचे कौतुक केले. प्रभुणे म्हणाले की, चिंचवडमध्ये क्रांतिवीर चाफेकर स्मारक समितीच्या माध्यमातून शोषित वंचित घटकांसाठी काम केले जाते. या शहराने अशा घटकांसाठी मोठे काम केले आहे. चोऱ्यामाऱ्या करणारी मुले आज शिकतात, मोठी होतात तेव्हा या शहराचे दातृत्व दिसून येते. सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.