भाजपचे माजी नगरसेवक लक्ष्मण सस्ते राष्ट्रवादीच्या गोटात
प्रभाग ०३ मध्ये वाढली रंगत ; राष्ट्रवादीचा मास्टरस्ट्रोक
लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने भारतीय जनता पक्ष विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना पहावयास मिळत आहे. निवडणुकीच्या तोंडावर पक्ष प्रवेशाचे लोण जोरात आहे. भाजपचे माजी नगरसेवक लक्षण सस्ते यांनी रीतसर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाहीर प्रवेश रविवारी (दिनांक २८) केला.
लक्ष्मण सस्ते यांनी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक २०१७ मध्ये कमळ चिन्हावर प्रभाग क्रमांक ०३ मधून लढवली होती. त्यामध्ये ते मोठ्या फरकाने विजयी झाले होते. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दूरदृष्टी नेतृत्वावर विश्वास ठाऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग क्रमांक तीन चे राष्ट्रवादी काँग्रेचे पॅनेल मजबूत झाल्याची चर्चा प्रभागात आहे. माजी नगरसेवक लक्ष्मण सस्ते (मोशी,भाजप), माजी नगरसेवक धनंजय आल्हाट (मोशी,उबाठा शिवसेना ), कुणाल किसन तापकीर ( चऱ्होली, उबाठा युवासेना जिल्हा प्रमुख ) यांनी राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केल्यामुळे प्रभाग क्रमांक ०३ ची रंगत वाढली आहे.

