सायंकाळच्या पावसाने कासारवाडी रेल्वे गेटाजवळील लोंढे चाळ पाण्यात
- लोंढे चाळवासियांची माऊली थोरात यांच्यासह महापालिका आयुक्तांकडे धाव
- आयुक्त शेखर सिंग यांनी लोंढे चाळवासियांची चर्चा
- पाणी काढण्यासाठी केले दोन पंप मार्गस्थ
- ह क्षेत्रीय अधिकारी लक्ष देत नसल्याची तक्रार
लोकमान्य टाइम्स : प्रतिनिधी
गुरुवारी (दिनांक १८) सायंकाळी झालेल्या पावसामुळे कसारवाडी येथील रेल्वेगेटजवळील लोंढे चाळीत गुडघ्या पेक्षा जास्त पाणी शिरले. त्यामुळे तेथील नागरिकांना घरातील साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठी धडपड करावी लागली. अनेक संसारपयोगी साहित्याचे नुकसान झाले. जेवढे वाचवता येईल तेवढे साहित्य घरात असणाऱ्या खुर्च्या, टेबल, खाटेवर ठेचण्यात आल्याचे दिसत होते.
तर् अनेक जण भांड्याने घरात शिरलेले पाणी बाहेर काढत होते. जास्तीचा पाऊस झाला की पाणी घरात शिरते याबाबत अनेक वेळा ह क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना कल्पना देऊनही त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे या अडचणीला समोर जावे लागत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
त्याअनुषंगाने माजी स्वीकृत नगरसेवक ज्ञानेश्वर उर्फ माऊली थोरात, सामाजिक कार्यकर्ते अतिश लांडगे यांनी याबाबत आयुक्त शेखर सिंग यांना कल्पना दिली. त्याअनुषंगाने लोंढे चाळीतील रहिवाशांनी महापालिका मुख्यालयात आयुक्त सिंग यांची भेट घेतली. नागरिकांनी येणाऱ्या अडी अडचणी आयुक्तांच्या समोर मांडल्या. आयुक्तानी त्या सोडविण्यासाठी सकारात्मक चर्चा केली.
चाळीत साचलेले पाणी काढण्यासाठी दोन पंप पाठवले आहेत. तसेच भविष्यात कोणत्या अडीअडचणी येतात त्या सोडविण्यासाठी अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांना शुक्रवारी कासारवाडीला पाठविण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे लोंढे चाळीतील नागरिकांनी आयुक्तांच्या भेटीवर समाधान व्यक्त केले आहे.

