पिंपरी चिंचवडपुणेबातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीयसांगलीसातारा

सोमवारनंतर केव्हाही जाहीर होऊ शकतात महापालिका निवडणुका 

  • मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवडसह २९ महापालिकेसाठी एकाचवेळी मतदान 
  • मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच होणार मतमोजणी?

लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे 

मुंबई, पुणे, पिंपरी -चिंचवडसह इतर २६ अशा एकूण २९ महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सोमवारनंतर (दिनांक १५)  महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

महापालिका निवडणुका दोन टप्यात होणारच्या चर्चेला पूर्णविराम

महापलिका निवडणुकीच्या दृष्टीने सोमवारनंतर आचारसंहिता केव्हा ही जाहीर होऊ शकते. महापालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर एका महिन्याभरात महाराष्ट्रातील सर्वच २९ महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुका दोन टप्यात होणार अशी चर्चा होती तिला पूर्णविराम मिळणार आहे. मतदान हे जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

महाराष्ट्रातील नगरपंचायत व नगरपालिका साठी दोन टप्यात मतदान होत आहे. दुसऱ्या टप्याचे मतदान हे दिनांक २० रोजी होणार असून पहिल्या व दुसऱ्या टप्यातील मतदानाची मतमोजणी एकाचवेळी दिनांक २१ डिसेंबरला घेण्यात येणार आहे. त्यानंतर महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. 

नागपूर, चंद्रपूर येथे ही होणार निवडणूक

दुसरीकडे काही महापालिका अशा आहेत, जिथे ५० टक्क्यांची आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यात आली आहे. यात नागपूर आणि चंद्रपूर या मनपांचा समावेश आहे. त्यामुळे या ठिकाणी निवडणुका होतील की नाही, अशी शंका होती. मात्र, आता ठिकाणी देखील निवडणुका होतील, अशी सुत्रांची माहिती आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार या निवडणुकीचा निकाल न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहणार आहे. त्यामुळे याठिकाणी देखील निवडणूक होणार आहे.

उमेदवारांची होणार दमछाक

राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने एका महिन्याच्या आत महापालिका निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करण्याचा मानस असल्याचे समजते. त्यामुळे मुंबई वगळता इतर महापालिका निवडणुकीमध्ये ०४ चा प्रभाग असल्याने त्याठिकाणी किमान ४५ ते कमाल ५५ हजार मतदान असल्याने सर्व मतदारापर्यंत पोहचण्यासाठी महापलिका निवडणुकीसाठी तयारी करणाऱ्याउमेदवारांची मतदारापर्यंत पोहचण्यासाठी  दमछाक होणार असल्याचे दिसत आहे.