…तर आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीस सामोरे जाईन
- इ.व्ही.ए. मशीन छेडछाड घोटाळ्यावर महाविकास आघाडीचा आरोप
- महाविकास आघाडीच्या आरोपाला श्रीगोंद्याचे भाजपचे नवनिर्वाचित आमदार विक्रमसिंह पाचपुते यांचे आवाहन
लोकमान्य टाइम्स : ऑनलाईन
लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले. त्यावेळी निवडणुकीमध्ये इ व्ही एम मशीनचा वापर झाला त्यावेळी त्यामध्ये घोटाळा वाटला नाही का ? जनतेने आम्हाला कौल दिला, हा महाराष्ट्राच्या दृष्टीने आनंदाचा दिवस असे म्हणणाऱ्या महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत यश मिळाले नाही की, तो काळा दिवस होतो. इ व्ही एम मशीन मध्ये छेडछाड करून घोटाळा केल्याचा आरोप होतो ? आमचा सरकारवर आणि निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवर विश्वास आहे , या विश्वासातूनच मी बोलतोय इ व्ही एम मशीन मध्ये घोटाळा झाल्याचा संशय झाल्याचे सिद्ध झाले तर मी महाराष्ट्रातील पहिला आमदार असेन, की जो आमदार पदाचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीस सामोरे जाईन असे मत श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे भाजप चे नवनिर्वाचित आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी व्यक्त केले.
लोकसभेला ही इ व्ही एम चा वापर त्यावेळी का शंका आली नाही
महाराष्ट्रातील विधानसभा २०२४ निवडणुकीत महायुतीने २३६ जागा जिंकल्या. लोकसभा निवडणुकीत ४८ पैकी ३१ जागा जिंकणाऱ्या महाविकास आघाडीला फक्त ४९ जागा आणि मित्र पक्षाच्या ०३ अशा एकूण ५१ जागा जिंकता आल्या. त्यामुळे महाविकास आघाडीने सत्ताधारी महायुतीने इ व्ही एम मशीनमध्ये छेडछाड करून घोटाळा केला ? महायुतीला निवडणुकीत यश मिळविण्याचा आरोप करीत या पद्धतीने महायुती जिंकणे म्हणजे महाराष्ट्रासाठी हा काळा दिवस असल्याचा आरोप केला आहे. याबाबत एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना श्रीगोंदा विधानसभा मतदार संघाचे भाजपचे नवनिर्वाचित आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
टेक्नॉलॉजी जूनी असली तरी ती आताच्या दृष्टीने महत्वाची आहे
आमदार पाचपुते पुढे म्हणाले की २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये तत्कालीन आमदार बबनराव पाचपुते यांचा मतदान प्रतिनिधी म्हणून निकालासाठी उपस्थित होतो. त्यावेळी एका मशीनच्यावर विरोधी उमेदवारांच्या प्रतिनिधीने शंका उपस्थित केली होती. त्यावेळी इ व्ही एम आणि इ व्ही पॅट च्या मतदानाची मोजणी केली असता ती तंतोतंत जुळली होती. त्यात चुकीचे काहीच नव्हते. मतदान करताना स्टेप पडताना दिसतात. तंत्रज्ञान जुन्या पद्धतीचे वापरले जात आहे. पण ती आताच्या दृष्टीने महत्वाची आहे. त्याला कोणतीच सिस्टिम कनेक्ट होत नाही. इ व्ही एम मध्ये जे मदर बोर्ड वापरले जातात त्यात जे आय सी आहेत ती रेडिओ टेक्नॉलॉजी आहे. त्यामध्ये कोणतीही फ्रेक्वेन्सी काम करीत नाही.
रेडिओ टेक्नॉलॉजीचा वापर असल्याने इ व्ही एम मध्ये कनेक्टिव्हिटीचा पर्याय नाही
याबाबत सगळे निवडणूक आयोगाने माहिती सांगून सुद्धा त्याच्यावर शंका निर्माण होते म्हणजे थोडक्यात कसे आहे आज जो हा प्रश्न निर्माण होतो तो आपल्याकडे ब्लॅक अँड व्हाईट छोटे फोन असायचे त्याच्यावर तुम्ही फोटो पाठवू शकतो का ? नाही ना ? त्यात ब्लूटूथ नाही, वाय फाय नाही, जर त्याच्यावर आपण काहीच पाठवित नाही तर इ व्ही एम मध्ये बद्दल कसा होऊ शकतो , त्यामध्ये ती रेडिओ टेक्नॉलॉजी आहे त्यामुळे इ व्ही एम ला कनेक्टिव्हिटीचा पर्यायच काहीच नाही. ते जे म्हणतात की इ व्ही एम मध्ये फेरबद्दल केले जातात. आमच्या मतदार संघात ३४५ मशीन आहेत. त्यामध्ये कसे काय बद्दल होवू शकतात ? छेडछाड कशी करणार ? प्रत्येक मशीनवर पोलिंग बूथ एजंट असतात, त्यावर त्यांच्या सह्या असतात, ते शील करताना त्या पोलिंग बूथ एजंट यांच्याबसमोरच केले जाते त्यामुळे छेडछाड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे विरोधक फक्त दिशाभूल करण्याचे काम करीत असल्याचा आरोप आमदार पाचपुते यांनी केला आहे.
लोकसभा निकालानंतर इ व्ही एमवर संशय का व्यक्त केला नाही
आज याच विरोधकांना इ व्ही एम चुकीचे वाटते, कालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या ३१ जागा निवडून आल्या त्यावेळी इ व्ही एम वर संशय व्यक्त केला नाही, हा जनतेने कौल दिला आहे म्हणून आनंद व्यक्त करण्यात येत होता, त्याच विरोधकांना विधानसभा निवडणुकीत अपयश आल्यावर लगेच हा महाराष्ट्राच्या दृष्टीने काळा दिवस होतो असा चिमटा आमदार पाचपुते यांनी विरोधकांना काढला.
माझा सरकार आणि निवडणूक आयोगावर विश्वास आहे
कर्जत जामखेड विधानसभेचे आमदार रोहित पवार यांनी इ व्ही एम उत्तम आहे असे मत व्यक्त केले आहे. त्यांचा त्यावर विश्वास आहे. तर मग त्यांच्यावर विरोधकांचा विश्वास नाही का ? जर आमदार रोहित पवार यांच्यावर विश्वास नसेल तर मी पहिल्या वेळी आमदार आहे. माझा सरकारवर विश्वास आहे, इ व्ही एम मशीन प्रक्रियेवर ही माझा विश्वास आहे, मी खात्रीने सांगतो या प्रक्रियेवर काही शंका निर्माण झाली तर मी आमदार पदाचा राजीनामा देईन आणि पुन्हा निवडणुकीला सामोरे जाणार मी महाराष्ट्रातील पहिला आमदार असेन असे प्रतिपादन आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी केले.