भोसरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा धुराळा
- भाजपच्या रणनीतीवर राष्ट्रवादीने फिरविले पाणी
- एकापेक्षा जास्त उमेदवारांना बिनविरोध कारण्यासाठी केला होता प्रयत्न
- मात्र ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने दिली तगडी पॅनेल
लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाला एकतर्फी वाटणारी निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनमुळे आणि माजी आमदार विलास लांडे, अजित गव्हाणे यांच्या रणनितिमुळे तगडी पॅनेल उभे करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश आल्याची चर्चा मतदारांच्या मध्ये आहे. भाजपने एकपेक्षा जास्त नगरसेवक बिनविरोध करण्याचा मन्सूबा यावेळी आखाला होता; मात्र यां मान्सूब्यावर भोसरीतील राष्ट्रवादीने पाणी फिरविल्याचे दिसत आहे.
पक्षासाठी हट्ट न करता नेत्यांनी घरातील उमेदवारीसाठीचा हट्ट सोडून पक्षाच्या कामात झोकून दिल्याने भोसरी विधानसभा मतदार संघात ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेची तगड्डी पॅनेल उभा राहिल्याचे दिसत आहे. त्याअनुषंगाने शुक्रवारी (दिनांक ०२) बहुतांशा ठिकाणी उमेदवारांच्या पदयात्रा काढून प्रचाराचा धुराळा उडविल्याचे दिसत आहे. मतदानासाठी अवघे १३ दिवस बाकी राहिल्याने कमी दिवसात मतदारांच्या पर्यंत पोहचण्यासाठी सर्वजण प्रयत्न करताना दिसत आहेत.
अब की बार सौ पर असा नारा भाजपने दिला आहे. त्यानंतर काही दिवसांनी पिंपरी चिंचवड भाजप निवडणूक प्रमुख आमदार शंकर जगताप यांनी अब की बार १२५ पार असा नारा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ०४ आमदार आणि तगडी पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची फौज भाजपच्या विजयासाठी प्रयत्न करीत आहे. २०१७ महापालिका निवडणुकीत ७७ नगरसेवक कमळ चिन्हवर निवडूण आणून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि भोसरीचे दमदार आमदार महेशदादा लांडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची २५ वर्षाची सत्ता उखडून टाकली होती.
तीच सत्ता पुन्हा मिळविण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रमुख आमदार शंकर जगताप, ग्रामीण भागातील नगरपालिका आणि नगर पंचायत वरती बहुतांशी ठिकाणी कमळ फुलविण्याची ज्यांनी किमया केली असे भोसरीचे दमदार आमदार महेश लांडगे यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघात विरोधकांचे अनेक मोहरे गळाला लावून भोसरीत फक्त भाजपचे हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. प्रभाग क्रमांक १ ते ९ (मधील अर्धा भाग ), प्रभाग क्रमांक ११, १२ आणि १३ असे एकूण ४६ नगरसेवकापैकी २०१७ मध्ये ३२ नगरसेवक भाजप निवडूण आणले होते. २०२६ च्या निवडणुकीमध्ये तो आकडा वाढविण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नगरसेवक त्यासाह इतर पक्षातील पदाधिकारी भाजपमध्ये घेऊन भोसरी विधानसभा मतदारसंघात जास्तीतजास्त नगरसेवक निवडणु आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामध्ये रवी बाबासाहेब लांडगे हे प्रभाग क्रमांक ०६ मधून बिनविरोध नगरसेवक होण्याचा बहुमान पटकावून सलग दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत (सर्व पक्षीय मदतीवर) बिनविरोध होण्याचा विक्रम केल आहे.
भाजपने चऱ्होली, दिघी, भोसरी गावठाण, गवळीनगर, धावडे वस्ती-चक्रपाणी वसाहत यां प्रभागात काही नगरसेवक बिनविरोध करण्यासाठी डाव आखाला होत. तसे काही प्रभागातील कार्यकर्ते व्हाट्सअप स्टेटस ही ठेवू लागले होते; भाजप ची खेळी यशस्वी होऊन्न द्यायचे नाही असे ठरवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कानावर काही गोष्टी घातल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने काही भाजपाटील पक्षप्रवेश तसेच शिवसेना उबाठा गटातबरोबर इतर पक्षातील प्रवेश घेत संबंधित पॅनेल स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न केला. त्याबरोबर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित निवडणूक लढविण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पथ्यावर पडला. त्याअनुषंगाने प्रभाग क्रमांक ०६, प्रभाग क्रमांक ०५, प्रभाग क्रमांक ०३, प्रभाग क्रमांक ०८ काही उमेदवारांना बिनविरोध करण्याचा प्रयत्न सुरु होता अशी चर्चा असताना राष्ट्रवादीने सावध पावले टाकत विरोधकांनी जी रणनीती आखाली होती तिच्यावार पाणी फिरविले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पूर्ण आणि ताकतीचे उमेदवार मिळतात की नाही अशी परस्थिती असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच प्रभागात तोडीस तोड उमेदवार दिले आहेत. एका वेळ अशी होती की कोणी कोणाच्या समोर उभा राहायचे याबाबत साशंकता असतानाच नियोजनबद्ध काम करून पक्षांतर्गत वादाला मूठमती देत तत्कालीन सत्ताधारी पक्षातीलच माजी महापौर यांना सादर केलेला उमदेवारी अर्ज बदलविण्यात आल्याची टीका सहन करवी लागत आहे. बहुतांशी प्रभागात मोठ्या उत्साहात राष्ट्रवादी काँग्रेसने माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष योगेश बहल, अजित गव्हाणे यांच्या उपस्थित प्रचाराला सुरुवात केली असून त्याला भोसरी विधानसभा मतदार संघातील नागरिकांचा मोठा सहभाग मिळत आहे.

