पिंपरी चिंचवड

उपमुख्यमंत्री अजितदादा भाजप आणि राष्ट्रवादी सोडून भाजपवासी झालेल्यांच्यावर आज काय बोलणार याकडे लक्ष      


लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यंमत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांची आज (रविवार दिनांक २८) जाहीर सभा प्रभाग क्रमांक १२ मध्ये सायंकाळी सहा वाजता होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक माजी नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. निवडणूक जाहीर झाल्यावर अजितदादांच्या विविध बैठका पार पडल्या त्याला भाजपमध्ये प्रवेश केलेले संबंधित माजी नगरसेवक उपस्थित असायचे; ते शरीराने राष्ट्रवादीत तर मनाने भाजपमध्ये असल्याचे या प्रवेशावरून दिसून आले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच अजितदादा पवारांचा विश्वासघात करून ते भाजपमध्ये सहभागी झाल्यामुळे संबंधितांवर आज ते काय बोलणार ? तसेच महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड शहारत भाजपला ते कोणते आव्हान देणार याकडे सर्व राजकीय पक्षाचे लक्ष लागून राहिले आहे.

महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरामध्ये जाहीर सभेच्या अनुषंगाने ते प्रथमच येत आहेत. २०१७ च्या निवडणुकीमध्ये मोदी लाटेत ही प्रभाग क्रमांक १२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे चार ही उमेदवार विजयी झाले होते. या निवडणुकीत ही राष्ट्रवादी काँग्रेसचीच हवा असल्याची चर्चा या प्रभागातील मतदारांच्यामध्ये आहे. त्याअनुषंगाने उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पहिली जाहीर सभा येथे घेतली आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक १२ मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार ही उमेदवारांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अजितदादा यांची जाहीर सभा जोरदार होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार तयारी ही केली आहे.  

पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, शरद पवार गटासह शिवसेना उबाठा गटातील बहुतांशी इच्छुक उमेदवारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे ; त्यामध्ये सर्वाधिक भरणा हा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटातील होता. अजितदादा यांच्या जवळचे आणि विश्वासातील व बहुतांशी पदे अजित पवारांच्या आशिर्वादावर उपभोगलेल्या विश्वासू सहकाऱ्यांनीच अडचणीच्या काळात त्यांना एकट्याला सोडल्यामुळे संबंधित माजी नगरसेवकांच्यावर उपमुख्यमंत्री अजितदादा काय बोलणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तसेच राज्यातील महायुती सत्तेत एकत्रित भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सहभागी आहेत. ते या निवडणुकीनिमित्त आमने-सामने आले आहेत. त्यामध्ये भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांची शिवसेने एकत्रित लढणार असे बोलले जात असले तरी भाजपने अब की बार १२५ पार असा नारा दिल्यामुळे शिवसेना एकनाथ शिंदे गटाला भाजप खरेच बरोबर घेणार का ? ऐन वेळी युती तोडणार का? युती किंवा भाजपवर अजितदादा काय टीका करणार , शहरवासीयांच्या प्रश्नाबाबत ते काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.