पिंपरी चिंचवडराजकीय

उबाठा शिवसेना गटाला भोसरी विधानसभा मतदारसंघात धक्का

  • भोसरी विधानसभा प्रमुख, युवासेना जिल्हाप्रमुख,भोसरी विधानसभा संघटकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
    लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे
     शिवसेना उबाठा गटाचे  भोसरी विधानसभा प्रमुख माजी नगरसेवक धनंजय आल्हाट, युवासेना जिल्हाप्रमुख ऍड. कुणाल तापकीर , भोसरी विधानसभा संघटक राहुल बाळासाहेब गवळी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवड येथे त्यांचा प्रवेश घेण्यात आला. या प्रवेशामुळे भोसरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्याअनुषंगाने शहरात राजकीय प्रवेशाना मोठे महत्व प्राप्त झाले आहे. राज्यात महायुतीमध्ये सत्ते असणाऱ्या भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने जोरदार रस्सीखेच सूर असल्याचे पाहावयास मिळत आहे. भाजप समोर २०१७ ची महापालिकेतील सत्ता टिकविण्याचे आव्हान आहे ; २०१७ पर्यंत सलग २५ वर्षे सत्तेत असणाऱ्या आणि भाजपमुळे सत्तेतून पायउतार व्हावे लागलेल्या राष्ट्रवादी काँग्रेससमोर भाजपला रोखण्याचे आव्हान आहे. त्यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये एकत्रित निवडणूक लढण्याचे निश्चित झाले असून त्याबाबत रविवारी (दिनांक २८) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुतावेच  केले.  त्याची अधिकृत घोषणा सोमवारी (दिनांक २९) होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.  

या राजकीय घडामोडीचा तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेशना महत्व प्राप्त झाले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भाजप समोर एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस मोठे आव्हान उभी करू शकते असा राजकीय वर्तुळात अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील शिवसेना उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला जवळ करण्याचे धोरण आखल्याचे दिसत आहे. त्यामुळे २०१२ महापालिका निवडणुकीतील एक अभ्यासू नगरसेवक अशी ओळख निर्माण केलेले भोसरी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष धनंजय आल्हाट, महापालिका प्रशासकीय काळात  गरज नसताना चऱ्होलीकरांच्या मानगुटीवर टी पी चे भूत बसविण्यात आले होते. त्याच्या विरोधात आवाज उठविणारे आणि ते होऊन न देण्यासाठी गावकऱ्यांना एकत्रित करून लढा यशस्वी करण्याची भूमिका बजाविणारे आणि चऱ्होलीतील सर्वसामान्य जनतेच्या मनावर राज्य करणारा युवा शिलेदार अशी ओळख निर्माण करणारा,

चऱ्होलीकरांच्या नागरी सुविधा सोडविण्यासाठी महत्वाची भूमिका पार पडणारा पाठीराखा अशी ओळख निर्माण करण्यात यश संपादन करणारे उबाठा शिवसेना युवासेनेचे  जिल्हाप्रमुख कुणाल तापकीर यांनी तसेच भोसरी विधानसभा मतदार संघात संघटक म्हणून जबाबदारी पार पडणारे प्रत्येक प्रश्नावर आवाज उठविणारे राहुल बाळासाहेब गवळी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित गव्हाणे यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे भोसरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची पक्षाची ताकद वाढण्यास हातभार लागणार आहे.