पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित निवडणुकीला जाणार सामोरे
- दहशत, दादागिरी पिंपरी-चिंचवडकरांनी खपवून घेऊ नये
- उपमुख्यमंत्री अजित पवार
लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे
आज काय चाललय दम दिला जातोय, बोलावलं जाते, मी माझ्या पंचवीस वर्षाच्या इतिहासात कधी ही ज्याला स्वखुशीने या , कधी फोडाफोडीचे राजकारण केले नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप ही लढायचे. आज काय चाललं आहे , याला फोडा , त्याला फोडा , त्याला इकडे घ्या, त्याला तिकडे घ्या , काहींना विचारले का रे काय झालं ? नाही राव दादा लईच दम दिला. माझी बांधकामे चालली आहेत, ती थांबविल्यावर कसे व्हायचे ? हे असले धंदे चालले आहेत. हे पिंपरी-चिंचवडकरांनी आता खपवून घेता काम नये. शेवटी सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे असे मत उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहरात महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने विजय संकल्प मेळाव्यात व्यक्त केले.
यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष आ. अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष योगेश बहाल,अजित गव्हाणे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकाकरी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड शहरात सुरु असणारी दहशत, दादागिरी , दमबाजीला शहरवासियानी बळी पडू नये , याच सर्व गोष्टीना नेस्तनाबूत करावयाचे असून पिंपरी-चिंचवड शहरात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस महापालिका निवडणुकीसाठी एकत्रित सामोरे जाणार असल्याचे ही उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी जाहीर केले.
पिंपरी-चिंचवडचा सर्वांगीण विकास हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही केला. औद्योगिक क्षेत्रे, आय टी पार्क च्या माध्यमातून लाखो लोकांना रोजगार दिला. कामानिमित्त शहरात वास्तव्यास आलेल्या नागरिकांसह स्थानिक नागरिकनांच्या दृष्टीने नागरी सुविधा मोठ्या प्रमाणावर विकसित केल्या. रस्ते, पाणी, विद्युत यंत्रणा सक्षम केली. शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता वाहुतुकीचे जाळे सक्षम करण्यासाठी मेट्रो ला मान्यता ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात दिली. निगडीपर्यंत ती वाढविण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. पुढे ती चाकणपर्यंत घेऊन जाण्यासाठी नियोजन आणि त्यादृष्टीने निधी ही अर्थमंत्री म्हणून निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच दोन रिंगरोड कामासाठी ही निधी उपलब्ध केल्याने ती कामे सुरु झाली आहेत. तसेच तिसरा रिंगरोड करण्यासाठी पी एम आर डी ए ला सांगितले आहे. पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी भामा आसखेड , आंद्रा धरणातून पाणी आणण्यासाठीच्या कामाला मंजुरी आणि निधी माझ्या काळातच मंजूर करण्यात आला आहे. पुढे जाऊन हे पाणी ही कमी पडणार असल्याने त्याची तरतूद करण्यासाठी ही नियोजन करण्यात आल्याचे यावेळी पवार यांनी स्पष्ट केले.
पिंपरी-चिंचवड शहरात १९९२-२०१७ या काळात काम करताना पारदर्शक करभार केला. पाच पैशाच्या आरोप झाला नाही. आज काय चाललंय , मोठ्या प्रमाणावर भ्र्रष्टचार बोकाळला आहे. रिंग केली जात आहे. कामे मिळण्यासाठी ठराविक जणांनाच कामे भरण्यास सांगण्यात येत आहेत कुठल्या कुठे टेंडर चालली आहेत. हा पैसे कोणाचा आहे , जनतेच्या पैशाची लूट सुरु आहे , हे तुम्ही समजून घेणार आहे की नाही ? असा प्रश्न उपस्थित नागरिकांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. एकेकाळी आशिया खंडात श्रीमंत असणारी पिंपरी-चिंचवड महापालिकेवर कशामुळे कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे हे संबंधिताना विचारणार आहेत की नाही ? असा प्रश्न उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी उपस्थित केला. त्यामुळे या निवडणुकीत कोणाला निवडून द्यायचे, आणि कोणाला नाही ? हा अधिकार मतदारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेने सर्वाना दिला आहे. त्यामुळे कोणाच्या दबावाला, दहाशीतील बळी न पडता महापालिकेत भ्र्रष्टचार केलेल्या लोकांना दूर करण्याचे आवाहन यावेळी पिंपरी-चिंचवडकरांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केले.

