शुभम दुबेच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर भारताचा नेदरलँडवर १७ धावानी विजय
-आयसीसी टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा
–शुभम दुबे, हार्दिक पांड्या, तिलक वर्मा, सूर्यकुमार यांची उपयुक्त खेळी
लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे बुधवारी (दिनांक १८) पार पडलेल्या आय सी. सी. टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ग्रुप अ मधील शेवटच्या सामन्यात भारतीय संघाने नेदरलँड संघावर १७ धावानी विजय प्राप्त केला. शुभम दुबेणे ६६ धावा आणि २ गडी बाद करुन अष्टपैलू खेळी करत भारताला विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला.
नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. डावाची सुरुवात अभिषेक शर्मा आणि इशान किशन यांनी सुरुवात केली. टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अभिषेक शर्माला सुर गवसलेला नव्हता. ग्रुप अ मधील शेवटच्या सामन्यात त्याला सूर गवसेल असे वाटत असतानाच पहिल्या षटकात तो तिसऱ्या चेंडूवर आर्यन दत्तने त्याला त्रिपळाचित झाला.
त्याच्या जागेवर आलेला तिलक वर्माने सुरुवात चांगली केली आहे. पाकच्या विरोधात उत्तम खेळी करणाऱ्या इशान किशन ही पाचव्या षटकात आर्यन दत्त ने त्रिफळाचित केले. तो बाद झाल्यावर कर्णधार सूर्यकुमार यादव पाचव्या षटकात मैदानात आला. सहाव्या षटकात २ बाद ५१ धावा करण्यात भारताला यश आले आहे.
सातव्या षटकात ८ च्या धावगतीने भारताने २ गाडयाच्या मोबदल्यात ५७ धावा केल्या आहेत. तिलक वर्माने २२ चेंडूत २७ तर सूर्यकुमारने १२ चेंडूत १२ धावा केल्या आहेत. तिलक वर्मा ३१ धावेवर ९ षटकात बाद झाला. त्याला एल बीकच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याच्या जागेवर शुभम दुबे मैदानात उतरले आहेत. ९ षटकात ७० धावत भारताचे ३ गडी बाद झाले आहेत. १० षटकात ३ गाडयांच्या मोबदल्यात भारताने ७.४ धाव गतीने ७४ धावा केल्या आहेत. त्यामध्ये सूर्यकुमार २२, शुभम दुबे २ धावा करुन नाबाद आहेत.
आर्यन दत्तने ४ षटकात १९ धावा देत महत्वपूर्ण अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा यांना त्रिपळाचित करुन बाद केले.भारतीय संघाला पहिला षटकार मारण्यासाठी १२ व्या षटकाची वाट पहावी लागली. शुभम दुबेने १३ व्या षटकातील पहिल्या चेंडूवर दुसरा षटकार मारला.
भारताच्या १०० धावा होण्यासाठी १२.१ षटके वाट पहावी लागली. १३ वे षटकामध्ये सर्वाधिक १९ धावा मिळाल्या. सूर्यकुमार आणि शुभमने पाचव्या गाड्यासाठी ४१ धावाची भागीदारी केली. सूर्यकुमार यादव २७ चेंडूत ३४ धावा करुन के.केलव्हीच्या चेंडूवर झेलबाद झाला. भारताने १४ षटकात ४ गाडयांच्या मोबदल्यात ८.०७ च्या धावगतीने ११२ धावा केल्या.
शुभम दुबेने २५ चेंडूत ५० धावा केल्या. त्यामुळे भारताच्या १७ षटकात ४ गाडयांच्या मोबदल्यात १५३ धावा बनल्या आहेत. सहाव्या गड्यासाठी २९ चेंडूत शुभम दुबे आणि हार्दिक पांडे यांनी ५० धावांची भागीदारी केली.
शुभम दुबे ३१ चेंडूत ६६ धावा केल्या. वैन बीकच्या चेंडूवर झेलबाद केले. हार्दिक पांड्या ३० धावा करुन शेवटच्या षटकात शेवटच्या चेंडूवर वैन बीकच्या चेंडूवर झेलबाद झाला. रिंकू नाबाद राहिला. भारताने ६ गाडयांच्या मोबदल्यात १९३ धावा केल्या.
भारताच्या १९४ धावाचा पाठलाग करताना डाव सुरु केला. पाच षटकात ३५ धावा केल्या. ६ व्या षटकात सूर्यकुमारने चेंडू वरुण चक्रवर्तीच्या हातात दिला. हा विश्वास सार्थ ठरवित वरुणने मक्सर ला त्रिफळाचित करीत भारतीय संघाला पहिला गडी बाद केल्याने नेदरलँड ची धावसंख्या १ गाड्याच्या मोबदल्यात ३५ धावा केल्या.
दुसरा झटका हार्दिक पांड्याने सातव्या षटकात दिला. दहावा षटकात २ गाडयांच्या बदल्यात नेदरलँड ने चार अतिरिक्त धावेसह ७.२ धावगतीसह ७२ धावा केल्या. एकरमनने 23 धावावर वरुण चक्रवर्तीणे झेलबाद केली. आर्यन दत्त ला गुगलीवर वरुण चक्रवर्ती ने त्रिफळाचित केले. नेदरलँड ची त्यानंतर १२.३ षटकात ४ बाद ९६ धावा. नेदरलँडच्या १०१ धावा १३.२ षटकात बनविल्या.
शुभम दुबेने पाचवा गाड्याच्या माध्यमातून २३ चेंडूत ३३ धावा करणाऱ्या डी लीडे ला झेलबाद केले. १५ षटकात ५ गाड्यांच्या मोबदल्यात ११८ धावा केल्या. जसप्रीत बुमराने सहावा गडी कर्णधार एडवर्ड च्या रूपाने १५ धावावर त्रिफळाचित केल्याने नेदरलँड ची अवस्था १६ षटकात ६ बाद १२६ धावा झाल्या आहेत. २० षटकात नेदरलँड संघाने ७ गाड्यांच्या मोबदल्यात १७६ धावा केल्या. सातवा गाड्याच्या मोबदल्यात क्रोसे ला शुभम दुबेने झेलबाद केले. भारताकडून वरुण चक्रवर्ती ने ०३, शुभम दुबे ने ०२, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह याने प्रत्येकी ०१ गडी बाद केला.
————————————

