पिंपरी चिंचवड

आमदार महेशदादा लांडगे यांच्या उपस्थित संतोष निसर्गंध यांचा वाढदिवस मोठ्या दिमाखात साजरा

  • रिंकू पिटेकर आणि अजय थोरात यांना ही आ. महेश लांडगे यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • संतोष निसर्गंध तळागळातील व सर्वसामान्यांची जाणं असणारा कार्यकर्ता
  • महापालिकेत अशा लोकांची आवश्यकता

लोकमान्य टाइम्स : बालाजीनगर (भोसरी)

तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत जावून त्यांच्या अडीअडचणी सोडविणे, वेळ पडली तर त्यासाठी रस्त्यावर उतरून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम करणे, लोकांच्या प्रश्नांची जाण असणारा आणि त्यासाठी कोणत्याही अडचणी समोर आल्या तर त्याला न डगमगता तोंड देणारा कार्यकर्ता म्हणजे संतोष निसर्गंध , असा कार्यकर्ता भविष्यात महापालिकेत आला पाहिजे असे मत भोसरी विधानसभा मतदारसंघांचे आमदार महेशदादा लांडगे यांनी व्यक्त केले.

ते बालाजीनगर येथे संतोष निसर्गंध, रिंकू पिटेकर आणि अजय थोरात यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन निमित शुभेच्छा देताना बोलत होते. यावेळी युवा नेते योगेश लोंढे, कामगार नेते बाबा कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार कामगार आघडी प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते,पँथर सुरेशभाऊ निकाळजे,युवा नेते निलेश निकाळजे,भिमरत्न प्रा.बी.बी.शिंदे,हरिश्चंद्र शिंदे,सुभाष बनसोडे,युवा नेते अशोक भडकुंबे,ईश्वर अभंग,अशोक डोंगरे आदी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागरभाऊ भोसले, विठ्ठल शिंदे, भिमरत्न प्रतिष्ठान चे अध्यक्ष विक्रम वाघमारे,भारत गरड, दता काटके, अमर जाधव, रितू गायसमुर्दे , नितीन पिटेकर, निलेश पवार, लखन सावंत व मित्र परिवाराने परिश्रम घेतले.