क्रीडा

नेमबाजीत भारताला दुहेरी पदक ; मनू भाकर आणि सरबजोत सिंगने पटकाविले १० मीटर पिस्तुल प्रकारात कास्य पदक

  • बारा वर्षानंतर मिळाले दुहेरी नेमबाजीत पदक
  • एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी मनू भाकर ही ठरली पहिली भारतीय महिला
  • २०१२ लंडन ऑलिम्पिक मध्ये गगन नारंग आणि विजय कुमार यांनी मिळविले होते पदक

लोकमान्य टाइम्स : ऑनलाईन

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मंगळवारी भारताला दुसरे पदक मिळाले. नेमबाज मनू भाकर आणि सरबजोत सिंग यांनी १० मीटर पिस्तुल मिश्र स्पर्धेत कांस्यपदक पटकावले आहे. या जोडीने कोरियन संघावर (१६-१०) विजय मिळविला.

एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी ठरली पहिली भारतीय महिला

मनू भाकरने दोन दिवसांपूर्वी (२८ जुलै) महिलांच्या १० मीटर पिस्तुल स्पर्धेतही कांस्यपदक जिंकले होते. यासह ती एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे.

नेमबाजीत भारताला १२ वर्षांनंतर दुहेरी पदक

१२ वर्षांनंतर ऑलिम्पिकच्या नेमबाजी स्पर्धेत भारताला दुहेरी पदके मिळाली आहेत. यापूर्वी २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये गगन नारंग आणि विजय कुमार यांनी नेमबाजीत पदक जिंकले होते.