महाराष्ट्र

खुशखबर…खुशखबर…मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

  • सप्टेंबर पर्यंत भरता येणार अर्ज
  • अर्ज भरताना झालेल्या चुका सुधारण्याबरोबर नवीन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

लोकमान्य टाइम्स : मुंबई

महायुतीच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू करण्यात आली आहे. तिचे अर्ज भरण्याची मुदत ऑगेस्ट पर्यंत होती. त्यामध्ये वाढ करून ती आता सप्टेंबर पर्यंत केल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. त्यामुळे या योजनेपासून वंचित राहणाऱ्या सर्व महिलांना या योजनेचा लाभ घेण्याची संधी मुख्यमंत्री शिंदे यांनी उपलब्ध करून दिल्यामुळे महिला वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महिला भगिनींच्या बँक खात्यात प्रती महिना १५०० रुपये जमा होणार आहेत. त्याअनुषंगाने जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या असे मिळून एकूण दोन महिन्यांचे ३ हजार रुपये महाराष्ट्रातील ८० लाख महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे.

या योजनेचा अर्ज भरताना काही त्रुटी निर्माण झाल्याने अनेक महिला या योजनेपासून वंचित राहिलेल्या आहेत. तसेच अजून काही महिलांनी या योजनेचे अर्ज केले नाहीत त्या महिलांनी अर्ज करून या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुदतवाढ दिली आहे . ज्यांच्या खात्यात या योजनेची रक्कम जमा झाली त्याअनुषंगाने काही प्रातिनिधिक स्वरूपात महिला भगिनीं च्याबरोबर संवाद साधल्यानंतर ते बोलत होते.

महाराष्ट्रातील या योजनेचे निकष पूर्ण करणाऱ्या सर्व महिला भगिनींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे दिलेल्या मुदतवाढीमध्ये अर्ज करणाऱ्यांचे बाकी असणाऱ्या महिला भगिनींनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले आहे. विरोधी पक्षातील नेते, पदाधिकारी यांनी या योजनेला विरोध केला. परंतु महायुतीचे सरकार जे शब्द देते ते पूर्ण करण्यात नेहमीच यशस्वी झाले आहे. आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही यशस्वी होणार आहे. त्यामुळे दिलेल्या मुदत वाढीमध्ये तळागाळातील सर्व घटकातील महिलांनी अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले आहे.