बातम्या

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना लाडक्या बहिणी योजनेच्या आभारासाठी पाठवल्या ३५० राख्या

राष्ट्रवादी महिला काँग्रेस तर्फे पिंपरी चिंचवड शहरात रक्षाबंधन साजर

लोकमान्य टाइम्स : पिंपरी चिंचवड


उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केली आणि या योजनेचा लाभ देखील लाडक्या बहिणीला मिळत आहे, त्यामुळे पिंपरी विधानसभेच्या वतीने सर्व बहिणींनी अजितदादा पवार यांना पोस्टाने ३५० राख्या पाठवण्याचा उपक्रम राबविला तसेच अजित पवार यांचे आभार व्यक्त केले.


यावेळी महिला अध्यक्ष प्रा.कविता आल्हाट, वरिष्ठ महिला कार्याध्यक्ष तथा पिंपरी विधानसभा अध्यक्ष कार्यक्रमाचे नियोजक कविता खराडे, माधवी सोनार, रतन जगताप, सविता धुमाळ, ग्राहक सेल अध्यक्ष पल्लवी पांढरे, भारती काळभोर, क्षमा सय्यद, मुक्ता चंदनशिवे, लता सोनवणे, विशाखा इंदलकर, अलका उघडे, देवी थोरात, रचना गायकवाड, नंदा देसाई, सुनिता शेवाळे, जया रोकडे, लक्ष्मी बनसोडे, ज्योती चक्रवर्ती, नंदा इंदलकर, सुनीता चाबुकस्वार आदी महिला उपस्थित होत्या.