आमदार महेशदादा लांडगे यांचा पट्टा निखिल बोऱ्हाडे यांनी फुलविला ३६५ कुटुंबाच्या जीवनात नोकऱ्या देऊन आनंद
- आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गद्शनाखाली मोशी येथील सर्वात मोठा नोकरी मेळावा भरविणार
- भाजप चे युवा नेते निखिल बोऱ्हाडे यांनी व्यक्त केला विश्वास
लोकमान्य टाइम्स : पिंपरी चिंचवड
मोशी भागातील सामाजिक कार्यकर्ते तथा भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेशदादा लांडगे यांचा पट्टा निखिल बोऱ्हाडे यांच्यावतीने मोशी येथे भव्य नोकरी मेळावा घेण्यात आला. यामध्ये ३६५ जणांना नोकऱ्या देण्यात आल्या. त्यातील १४२ जणांना जागेवरच नियुक्त पत्र आमदार महेशदादा लांडगे यांचे बंधु कार्तिक लांडगे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.
एकावेळी ३६५ जणांच्या कुटुंबामध्ये आनंद फुळविण्याचे काम केल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील फुललेला आनंद पाहण्या सारखे मोठे भाग्य नसल्याची प्रतिक्रिया युवा नेते निखिल बोऱ्हाडे यांनी यावेळी व्यक्त केले.
शहराच्या वाढत्या नागरीकरणामुळे अनेक होतकरू तरुण-तरुणी महिला, उच्चशिक्षित, व कमी उच्चशिक्षित लोक नोकरीच्या शोधात असतात याच पार्श्वभूमीवर निखिल बोऱ्हाडे सोशल फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित आयोजित नोकरी महोत्सवाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. हा नोकरी मेळावा जाधववाडी, चिखली येथील रामायण मैदानावर पार पडला.
यावेळी ६१० होतकरूंनी यात सहभाग घेतला होता, यापैकी ३६५ जणांना नोकरी मिळाली आहे, तर १४२ जणांना जागेवरच नियुक्त पत्र आमदार महेश लांडगे यांचे बंधू कार्तिक लांडगे व पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी महापौर राहुल जाधव, माजी उपमहापौर शरद बोऱ्हाडे, माजी नगरसेवक माऊली जाधव, भारतीय जनता पार्टीचे युवा नेते निलेश बोराटे, सामाजिक कार्यकर्त्या तथा भारतीय जनता पार्टीच्या सोनमताई जांभुळकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी परिसरातील व पिंपरी चिंचवड शहरातील ४० कंपन्या सहभागी झाल्या होत्या.
सामाजिक कार्यकर्ते निखिल बोऱ्हाडे यांनी नोकरी मेळाव्यात सहभागी झालेल्या सर्व कंपनी प्रशासनाचे आभार मानत त्यांच्या प्रतिनिधींचा सन्मान केला. नोकरी महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन हे अचानक पणे करण्यात आले त्यामुळे खूप कमी वेळ मिळाला, नोकरी महोत्सवात नोकरी लागलेल्या सर्वांचे अभिनंदन करत ते म्हणाले की, भविष्यात आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मोशीतील सर्वात मोठा नोकरी महोत्सव आपण येत्या काळात घेऊ असे सामाजिक कार्यकर्ते निखिल बोऱ्हाडे म्हणाले.