पिंपरी चिंचवड

‘ शुक्लकाष्ठ’ सोडेना अजितदादा पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचा पिच्छा ; चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी यांचा अजितदादा पवार यांनाच इशारा

  • चिंचवड विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसला घ्या
  • अन्यथा तुतारी वाजविणारा
  • अजितदादा पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचा दादा यांनाच इशारा

लोकमान्य टाइम्स : चिंचवड

आठ ते दहा दिवसात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता लागणार असल्याची चर्चा आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी व इतर प्रमुख पक्षात जागा वाटपाचा तिढा सुरू आहे. जागा वाटपात कोणतेच वाद नाहीत असे सर्वच पक्षाचे वरिष्ठ मते व्यक्त करीत असेल तरी ही कोणत्या जागा कोणाला सोडायच्या यावरून सर्वच पक्षात रस्सीखेच सुरू आहे. महायुतीमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळणार असल्याने महायुतीचे घटक पक्ष असणाऱ्या शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाच्या जागा आपसूकच कमी होणार आहेत.

दोन नंबर ला शिवसेनेला आणि तीन क्रमांकावर अजितदादा गटाला जागा देण्यात येणार असल्याने जागा वाटपाचे शुक्लकाष्ठ अजितदादा यांच्या पाठीमागे लागले आहे. त्यातच आता पिंपरी चिंचवड शहरात अजितदादा पवार गटाच्याच अनेक ज्येष्ठ, वरिष्ठ आणि माजी नगरसेवकांनी शरद पवार गटात प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे. त्यात आता चिंचवड ची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे घ्या अन्यथा आम्ही तुतारी वाजविणारा असा इशारा दिल्यामुळे अजितदादा पवार गटासमोर उमेदवारीसाठी प्रयत्न करण्याबरोबर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी इतरत्र न जाऊन देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे अजितदादा चिंचवड जागा मिळविण्यात यश मिळवितात का नाही ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चिंचवड विधानसभा मतदार संघातील महायुतीमध्ये उमेदवारीवरून संघर्ष पेटला आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची ही ताकद आहे हे अनेक निवडणुकीत दिसून आले आहे. त्यामुळे काही झाले तरी यावेळी चिंचवड विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळाला पाहिजे अशी भूमिका घेत अजितदादा पवार गटाच्या आजी माजी नगरसेवकांनी व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी खुद्द अजितदादा पवार यांनाच आव्हान देत जर घडयाळ ला हा मतदार संघ सुटला नाही तर आम्ही तुतारी हातात घेणार असा इशारा शुक्रवारी (दिनांक ४) चिंचवड मतदार संघातील एका पदाधिकाऱ्यांच्या हॉटेल मध्ये झालेल्या बैठकीत घेतल्याचे समजते.

त्यामुळे अजितदादा पवार गट सोडून एक एक पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात जाण्याच्या मनःस्थितीत दिसत आहेत. त्यात चिंचवड विधानसभा मतदार संघातील अजितदादांचे कट्टर समर्थक ही चिंचवड मतदारसंघ जर राष्ट्रवादीला घेतला नाही तर आम्ही पक्ष सोडणार असा इशारा दिला आहे. त्यामुळे महायुतीत सामील होत सत्तेत सहभागी झाल्याने सर्व व्यवस्थित होईल अशी मनीषा बाळगणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटापुढे इतर मतदार संघाप्रमाणे चिंचवड बाबत ही बाका प्रसंग उभा राहिला आहे.

हे जरी खरे असले तरी या बैठकीत उपस्थित असणाऱ्या एका माजी नगरसेवकाने आम्ही काही झाले तरी अजितदादा यांच्या बरोबरच राहणार आहोत, अशी भूमिका या बैठकीत व्यक्त केली. त्यावर आम्ही ही दादा ना मानतो, परंतु यावेळी काही झाले तरी चिंचवड मतदारसंघ राष्ट्रवादीकडे घ्यावा यासाठी पदाधिकारी आक्रमक झाल्याचे पाहावयास मिळत असल्याने पिंपरी चिंचवड मध्ये अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागे लागेल शुक्लकाष्ठ काही पिच्छा सोडताना दिसत नसल्याची चर्चा शहराच्या राजकारणात आहे.