‘ मी शपथ घेतलीय ‘ म्हणत शीतल उर्फ विजय शिंदे यांनी चिंचवड विधानसभेत सुरू केला प्रचार
- चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजप मध्ये उमेदवारीवरून निर्माण झालाय ट्विस्ट
- विजय शिंदे यांनी घेतली प्रमुख पदाधिकारी यांची भेट
- वाढता पाठिंबा ; फलकाच्या माध्यमातून भाजपच होणार विजयी विश्वास
- संघ परिवार, निष्ठावंत, जुन्या पदाधिकाऱ्यांनी दिला आशीर्वाद
- सर्व पक्षीय संबंधामुळे ‘ विजय ‘ होऊ शकतो सोपा
लोकमान्य टाइम्स : चिंचवड विधानसभा
चिंचवडच्या विकासाला गती देण्यासाठी, महाराष्ट्रात नंबर १ चे शहर बनविण्याची, चिंचवड करांचे स्वप्न पूर्ण करण्याची मी घेतलीय शपथ म्हणत भाजपचे निष्ठावंत माजी नगरसेवक शीतल उर्फ विजय शिंदे यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघात इच्छुक असून उमेदवारी मलाच मिळणार असा विश्वास व्यक्त करीत चिंचवड विधानसभा मतदार संघात गाठीभेटीना सुरुवात केली असून त्यांना मतदारसंघात चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.
चिंचवड विधानसभा मतदार संघ भाजपचा बालेकिल्ला आणि हक्काचा विजयी मतदारसंघ अशी राज्याच्या राजकारणात ओळख आहे. त्यामुळे याठिकाणी उमेदवारीसाठी प्रथमच भाजपमध्ये चुरस निर्माण झाली आहे. त्यामध्ये विद्यमान आमदार अश्विनीताई जगताप, भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप, शत्रुघ्न काटे, चंद्रकांत नखाते आणि शीतल उर्फ विजय शिंदे यांच्यामुळे उमेदवारीत रंगत निर्माण झाली आहे.
या चार इच्छुकांकडून उमेदवारी आम्हालाच मिळणार असा विश्वास व्यक्त केला आहे. तर काही झाले तरी यावेळी घराणेशाही नको म्हणत काटे, आणि नखाते यांनी उमेदवारीवर दावा केला आहे. तर मी पक्षाचा निष्ठावंत आहे, माझा कोणाच्या उमेदवारीला विरोध नाही; परंतु मी ही इच्छुक असल्याने मला उमेदवारी मिळेल असा मला विश्वास आहे. त्याअनुषंगाने शीतल उर्फ विजय शिंदे यांनी दिवंगत लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या समाधीचे दर्शन घेत प्रचाराला सुरुवात केली आहे.
सर्व पक्षीय संबंधामुळे तसेच संघ परिवार, भाजप मधील ज्येष्ठ मार्गदर्शक यांचा शुभाशीर्वाद घेत राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, आरपीआय, विविध संघटना पदाधिकारी यांच्या गाठी भेटी घेतल्या. त्यामध्ये शीतल उर्फ विजय शिंदे यांना उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे चिंचवड मध्ये वातावरण निर्माण झाल्याचे पाहावयास मिळत आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघात उमेदवारी मिळणार असा विश्वास व्यक्त करीत सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांना भेटून मतदान रुपी आशीर्वाद द्यावा यासाठी गाठीभेटी घेताना शीतल उर्फ विजय शिंदे