बातम्यामहाराष्ट्रराजकीय

मंगळवारी होणार विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा

  • आज राज्य मंत्रिमंडळाची शेवटची बैठक
  • या बैठकीत घोषणांचा पाऊस पडण्याची शक्यता

लोकमान्य टाइम्स : राजकीय डेस्क

आज (सोमवार दिनांक १४) सकाळी ११ वाजता राज्य मंत्रिमंडळाची शेवटची बैठक मंत्रालयात होणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. त्याअनुषंगाने मंगळवारी ( दि. १५) राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा होऊन? आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे.

सत्तेत असणाऱ्या महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील जनतेला खुश करण्याच्या दृष्टीने गेल्या आठवड्यात अनेक शेकडो महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्यातच सोमवारी सकाळी ११ वाजता राज्य मंत्री मंडळाची शेवटची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत ही राज्यातील मतदारांना खुश करण्याच्या दृष्टीने अनेक निर्णय सरकारच्या वतीने घेण्यात येतील अशी चर्चा आहे. राज्यातील सर्वच घटकांना या निर्णयाच्या माध्यमातून महायुतीकडे वळविण्यासाठी विचारपूर्वक निर्णय घेण्यात येऊ शकतात. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीला महत्व प्राप्त झाले आहे.

सोमवारी (दिनांक १४) मंत्री मंडळाची बैठक पार पडल्यानंर मंगळवारी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणते निर्णय घेण्यात येतील याकडे सत्ताधारी आमदार, पदाधिकारी यांच्यासह विरोधी पक्षांचे ही लक्ष लागून राहिले आहे.