महाराष्ट्रराजकीय

महाराष्ट्रात देवाभाऊचं ; औपचारिकता बाकी

भाजप केंद्रीय नेतृत्वाच्या निर्णय एकनाथ शिंदे यांनी केला मान्य

पाच डिसेंबर ला आझाद मैदानावर होणार शपथविधी

लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे

दाढीला हलक्यात घेऊ नका असे शिंदे गटाच्या प्रवक्त्याने दिलेला इशारा, त्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री आपल्या  दरे (महाबळेश्वर) मुळ गावाला केले जवळ ; त्यानंतर त्यांनी स्वपक्षाच्या आमदारांबरोबर माध्यमांशी ठेवलेला दुरावा, एकतर्फी सत्ता येऊन ही आठवडा उलटला तरी होत नसलेला शपथविधी या गोष्टीमुळे महायुतीमध्ये निर्माण झालेले तणावाचे वातावरण, त्यानंतर दुसऱ्या दिवशी माध्यम प्रतिनिधी यांच्याशी ठाण्यात येऊन साधलेला संवाद त्यामध्ये महायुतीचे सरकार हे सर्वसामान्य नागरिकांना  न्याय देणारे सरकार आहे, आमच्यात पदावरून कोणतेच दुरावे झालेले नाहीत, केंद्रीय नेतृत्व जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असल्याचे जाहीर करीत भाजपचा मुख्यमंत्री होण्यास माझी काहीच हरकत नाही असे जाहीर केले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार यात तिळमात्र शंका राहिलेली नाही. त्यातच मंगळवार पर्यंत त्यांना भाजपचा विधिमंडळ गटनेता निवडण्यात येईल असे विश्वनीय वृत्त आहे. त्याची औपचारिकता बाकी आहे. त्यामुळे महाराष्ट्रात देवाभाऊच असे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये महाविकास आघाडीने महायुतीला जमिनीवर आणले होते. ४८ पैकी ३० आणि एक बंडखोर खासदार असे एकूण ३१ खासदार निवडून आणण्याची किमया महाविकास आघाडीने केली होती. ४८ पैकी किमान ४५ जागा जिंकणार अशी वल्गना करणाऱ्या महायुतीच्या नेत्याना या निकालामुळे जमिनीवर आणले होते. लोकसभेतील विजयामुळे मविआ आपण विधानसभा ही सहज जिंकू हा आत्मविश्वास नढल्याचे दिसले. विधानसभा निवडणुकीत तिन्ही पक्षात समन्वयाचा असलेला अभावामुळे फटका बसला ; परंतु त्याच्या उलट महायुती ने लोकसभा निवडणुकीतील निकालातून धडा घेत विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी मध्य प्रदेशमध्ये शिवराज चौहान यांनी लागू केलेली लाडली बहाणा ही योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात सुरु केली.

महाराष्ट्रात लाडकी बहीण म्हणून महिन्याला दिड हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. तसेच ज्येष्ठाना तीर्थयात्रेसाठी अनुदान, एक रुपयात पीक विमा योजना, सात पॉवरहॉर्स पर्यंत वीज बिल माफ योजना , तरुणांसाठी अनुदान योजना राबविल्या. त्याला विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्वयं सेवक संघाने भाजप प्रणित महायुतीने राबविलेल्या विविध योजाना तळागाळापर्यंत पोहचीविण्याचा पेललेला शिवधनुष्य , महायुतीतील घटक पक्षांनी राबविलेल्या सर्व योजना तळागाळापर्यंत पोहचविल्यामुळे आणि लाडक्या बहिणींनी  मोठ्या प्रमाणात महायुतीच्या घटक पक्षांना मतदान केल्यामुळे २८८ जागेपैकी २३६ जगावर विजय मिळविला. त्यामध्ये  मोठा भाऊ होण्याचा मान १३२ जागांसह भाजप ने मिळविला. त्याखालोखाल एकनाथ शिंदे यांची शिवसेना पक्षाने ५७ तर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाने ४१ जागा जिंकल्या.

 भाजप प्रणित महायुतीने एकतर्फी विजय मिळविल्यामुळे मोठा भाऊ बनलेल्या भाजपचाच मुख्यमंत्री होणार हे कोणा ज्योतिषाला विचारण्याची गरज राहिली नव्हती. त्यात भाजपचा मुख्यमंत्री होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाने बिनशर्त पाठिंबा दिला. त्यामुळे ज्यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक लढली त्या एकनाथ शिंदे याना पुन्हा मुख्यमंत्री करण्यात येईल हा शिंदे समर्थक आमदारांचा विश्वास होता त्याला भाजप आणि त्यांना बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाने तडा घालविला. काही काळ काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दबाव तंत्राचा वापर करण्याचा प्रयत्न केला. जर भाजप ला मुख्यमंत्री पद देण्यासाठी आम्हाला गृह, अर्थ मंत्री पद द्यावे अशी मागणी केली.

मात्र शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी टाकलेल्या दबावाला कोणीच महत्त्व न दिल्यामुळे भाजप केंद्रीय नेतृत्वाने जो आदेश शिंदे याना दिला आहे तो मान्य करण्यापलीकडे काहीच पर्याय न उरल्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु झाली आहे. जरी शिंदे गटाने बाहेरून पाठिंबा दिला तरी भाजपचे १३२ , अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे ४१ आणि चार अपक्ष असे मिळून १७७ आमदार होतात, आणि हि आकडेवारी सत्ता स्थापनेसाठी मॅजिक फिगर पेक्षा जास्त असल्याने शिंदे गटाला भाजप ने दिलेल्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे असे दबक्या आवाजात चर्चा आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांकडून महाराष्ट्रात फक्त देवाभाऊच याचे प्रमोशन सुरु झाले आहे.