क्रीडापिंपरी चिंचवड

राजमाता जिजाऊ महाविद्यालयाला विजेतेपद

अंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धा

लोकमान्य टाइम्स : भोसरी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत पुणे जिल्हा क्रीडा विभाग आयोजित अंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत भोसरी येथील राजमाता जिजाऊ महाविद्यालयाने विजेतेपद पटकाविले.


पुसाणे येथील बारणे क्रिकेट अकादमी या ठिकाणी उपांत्यपूर्व फेरीच्या झालेल्या सामन्यामध्ये रामकृष्ण मोरे महाविद्यालय, आकुर्डीचा १३ धावांनी पराभव करून उपांत्य फेरी गाठली. एस आय टी महाविद्यालय, लोणावळा या ठिकाणी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये गव्हर्मेंट कॉलेज अवसरी यांचा १२९ धावांनी पराभव करून अंतिम फेरीमध्ये धडक मारली.


अंतिम फेरीत इंदिरा महाविद्यालय, वाकड यांना २० षटकांमध्ये ७/११८ धावांमध्ये रोखले. सदरचे आव्हान १२ षटकांमध्ये २ गड्यांच्या मोबदल्यात ८ षटके बाकी असतानाच दणदणीत विजय मिळवला. सदरच्या संपूर्ण सर्व सामान्यांमध्ये उत्कर्ष चौधरी, अर्जुन वाघ,अमन मुल्ला ,विवेक टिपरे, सुशांत कांबळे यांच्या फलंदाजी व पुलकेश हलमुनी अथर्व चौधरी ,गणेश राठोड, समर्थ वाबळे ,सक्षम कडलक, समर्थ जगताप यांच्या गोलंदाजीच्या जोरावर हे सांघिक विजेतेपद पटकावले. सदर स्पर्धेमध्ये ७२ संघाने सहभाग नोंदविला होता. सदस्य संघास शारीरिक शिक्षण संचालक डॉ. गणेश चव्हाण यांनी मार्गदर्शन लाभले.


संघाच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार विलास लांडे ,खजिनदार अजित गव्हाणे ,सचिव सुधीर मुंगसे, विश्वस्त विक्रांत लांडे महाविद्यालयाचे प्राचार्य केजी कानडे , उपप्राचार्य किरण चौधरी, प्रबंधिका अश्विनी भोसले सर्व जिमखाना सदस्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.