देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे होणार सहभागी
- शपथविधी देवेंद्र फडणवीस यांचा ; चर्चा मात्र एकनाथ शिंदे यांची
- ‘ गृहमंत्री ‘ शपथविधीनंतर अमित शहा यांच्या उपस्थित होणार बैठक
लोकमान्य टाइम्स : मुंबई
एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत यावर शिक्कामोर्तब झाले आहे. सायंकाळी साडे पाच वाजता शपथविधी होणारं आहे. तर ज्यावरून मंत्रिमंडळात सहभागी व्हायचे की नाही याबाबत जवळपास दहा दिवस चर्चा चालू होते ते गृहमंत्री पद कोणाला याबाबत शपथविधी नंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थित बैठक होऊन त्यामध्ये अंतिम होणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
भाजप प्रणित महायुती सरकारने अपक्ष आणि मित्रपक्षातील २३७ जागांसह एक हाती सत्ता प्रस्थापित केली. भाजपने १३२ जागांसह महायुतीमध्ये सर्वाधिक जागा जिंकल्या. त्यामुळे मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस हेच विराजमान होणार हे अंतिम होते. दरम्यान काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने निवडणूक लढली होती. त्यामुळे किमान एक वर्ष तरी शिंदे याना मुख्यमंत्री पद द्यावे अशी मागणी शिंदे व त्यांच्या समर्थक आमदारांनी केली होत. त्यावरून जवळपास निकाल लागल्यापासून ११ दिवस उलटले तरी सत्ता स्थापन होत नसल्याने महायुतीत अस्वस्थता पसरली होती.
गुरुवारी (दि.५) आझाद मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांच्या उपस्थित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा शपथविधी पार पडणार आहे. बुधवारी (दि.४) रात्री उशिरापर्यंत एकनाथ शिंदे हे महायुती च्या मंत्रिमंडळात सहभागी होणार की नाही याबाबत साशंकता होती. बुधवारी भाजप विधिमंडळाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यामुळे मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस शपथ विधी घेणार आहेत. त्यानंतर फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर जात काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. आपण मंत्रिमंडळात सहभागी व्हावे यासाठी बंद दाराआड चर्चा झाली. शिवसेना शिंदे गटाला कोणती पदे देणारा याबाबत चर्चा झाल्याचे समजते. परंतु मंत्रिमंडळात शिंदे सहभागी होणार का ?याबाबत गुरुवारी सकाळी पर्यंत निश्चित झाले नव्हते.
त्यानंतर आज सकाली शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे अनेक वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे याना भेटले. त्यांनी आपण मंत्रिमंडळात सहभागी व्हावे , यासाठी शिंदे समर्थक आमदारांनी शिंदे याना घळ घातल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात सहभागी होणार असल्याचे निश्चित झाल्यानंतर शिंदे समर्थक आमदारांनी राज्यपाल यांची भेट घेतली. त्यामुळे जवळपास निकाल लागल्यापासून ११ दिवस उलटले त्यामुळे जसे २०२४ च्या निवडणुकीमध्ये महायुतील महाराष्ट्राच्या जनतेने मोठा जनाधार देत २३७ आमदार ची ताकद सरकार स्थापण्यासाठी दिली आहे. निवडणुकीच्या दरम्यान जाहीरनाम्याद्वारे जी आश्वसनें दिली आहेत. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजितदादा पवार हे पूर्ण करतील असा आशावाद महाराष्ट्राच्या जनतेला असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची टीम पूर्ण करील असा विश्वास जनतेला असल्याने या शपथ विधीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.